ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Mumbai Rains : मुसळधार पावसाने मुंबईत पाणी साचले, लोकल-रस्ते वाहतूक ठप्प

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 08:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Mumbai Rains  : मुसळधार पावसाने मुंबईत पाणी साचले, लोकल-रस्ते वाहतूक ठप्प

शहर : मुंबई

मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत 150-200 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह ठिकठिकाणी गुडघ्याएवढं पाणी साचलं आहे. तसेच सांताक्रुझ, अंधेरी यासह पश्चिम उपनगरात घरांमध्ये पाणी शिरले आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कर्मचारी हे अडकून पडले आहेत.

मुंबईत अतिवृष्टीची शक्यता

मुंबईत येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर पालघर जिल्ह्यातही ऑरेंज अॅलर्ट दिला असल्याने त्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.

 

मागे

मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस
मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस

पावसाने मुंबईला पुन्हा एकदा चांगलंच झोडपलं आहे. मुंबईमध्ये गेल्या काही तास....

अधिक वाचा

पुढे  

अत्यावश्यक सेवा वगळता खासगी कार्यालये आणि आस्थापना बंद ठेवण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन
अत्यावश्यक सेवा वगळता खासगी कार्यालये आणि आस्थापना बंद ठेवण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन

मुंबई शहरासह उपनरांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी संध्याकाळपास....

Read more