ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Mumbai Rains | मुंबईत 48 तासात 240 मिमी पाऊस, हळूहळू मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 12:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Mumbai Rains | मुंबईत 48 तासात 240 मिमी पाऊस, हळूहळू मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर

शहर : मुंबई

मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झाले. या पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुंबईत गेल्या 48 तासात तब्बल 240 हून जास्त मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि आजही पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत आज मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. काल झालेला पाऊस हा परतीचा पाऊस नसून मान्सुनच होता. आज संध्याकळपासून पावसाचा जोर ओसरणार, अशी माहिती आएमडीने दिली आहे.मुसळधार पावसामुळे मुंबईच्या किंग्ज सर्कल, माटूंगा परिसरात कमरेपर्यंत पाणी भरलं होतं. त्यामुळे दुकानदारांनी त्यांची दुकानं आजही बंदच ठेवली आहेत. दोन्ही बाजूंची वाहतूक सध्या सुरु आहे, तर मनपाकडून रस्त्यावर साचलेला गाळ काढण्याचं काम सुरु झालं आहे.

कालच्या भयानक पावसानंतर मुंबईचे जनजीवन पुन्हा सुरळीत झालं आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले होते आणि मुंबई बुडाली होती. दादर टीटी सर्कल पाण्याखाली गेलं होत. पण आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दादर परिसरात वाहतूक व्यवस्था आणि दुकान पूर्ववत सुरु झाली आहे.