ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांची एक्झिट

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांची एक्झिट

शहर : पुणे

            पुणे - अभिनयसृष्टी आणि सामाजीक क्षेत्रामध्ये पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत राहिलेल्या डॉ. श्रीराम लागू यांनी वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे चतुरस्त्र अभिनेते, मराठी रंगभूमीचा अनभिषिक्त नटसम्राट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.  


         मराठी चित्रपट, नाटक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या योगदानाने आपला एक अमीट ठसा निर्माण केला. मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड समजल्या जाणाऱ्या 'नटसम्राट' या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका त्यांनी केली आणि हे पात्र अजरामर झालं. आकाश पेलताना, काचेचा चंद्र, गार्बो, गिधाडे, नटसम्राट, आंधळ्यांची शाळा, गुरुमहाराज गुरु, उद्धवस्त धर्मशाळा, चंद्र आहे साक्षीला, किरवंत, बेबंदशाही, सूर्य पाहिलेला माणूस, उद्याचा संसार अशा अनेक मराठी नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या.

 

         त्यांनी शंभरहून अधिक हिंदी सिनेमात आणि ४० हून अधिक मराठी सिनेमांमध्ये काम केलं. तसेच २० हून अधिक मराठी नाटकांचं दिग्दर्शनही केलं. त्यांनी मराठी, हिंदीबरोबरच गुजराती रंगभूमीवरही काम केलं. १९६९मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. 


          नाटककार वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या 'नटसम्राट' या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता, ध्यासपर्व, सुगंधी कट्टा सारख्या अनेक चित्रपटांतून काम करत मराठी रंगभूमी आणि सिनेक्षेत्रात दबदबा निर्माण केला. पिंजरा, सिंहासन आणि मुक्तामधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
 

मागे

मनोज नरवणे हे देशाच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्त
मनोज नरवणे हे देशाच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्त

            पुणे - आकाशवाणीच्या निवेदिका सुधा नरवणे यांचे पूत्र मूळचे प....

अधिक वाचा

पुढे  

शहीद जवान जोतिबा चौगुलेंवर अंत्यसंस्कार
शहीद जवान जोतिबा चौगुलेंवर अंत्यसंस्कार

       कोल्हापूर - गडहिंग्लज तालुक्यातील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्....

Read more