ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ओबीसी आणि भटक्या समाजाच्या 10 हजार मुलांना NEET आणि JEE प्रशिक्षण : विजय वडेट्टीवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 02, 2020 10:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ओबीसी आणि भटक्या समाजाच्या 10 हजार मुलांना NEET आणि JEE प्रशिक्षण : विजय वडेट्टीवार

शहर : नागपूर

ओबीसी आणि भटक्या समाजाच्या 10 हजार मुलांना नीट आणि जेईई परीक्षेचे प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ओबीसी, भटक्या जमातीसाठी महाज्योतीनं मेगा प्लान आखला असून, महाज्योती संस्थेला आतापर्यंत 50 कोटी मिळाले आहेत. तर 150 कोटी प्रस्तावित असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. (Vijay Wadettiwar On Obc Reservation)

पोलीस प्रशिक्षणासाठी ‘महाज्योती’ लवकरच जाहिरात काढणार असून, प्रशिक्षणासाठी गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी 300 विद्यार्थी निवडणार असून, एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी 500 विद्यार्थ्यांची निवड गेली जाणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करु नका, अशी विनंतीही मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरु करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललं आहे, त्यांना वेठीस धरायला नको, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.

‘मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको’, अशा भावनाही विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत. टीव्ही 9 कडे दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेला भाजपचं समर्थन

मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकारने संवेदनशीलपणाने लक्ष घालण्याची गरज आहे. शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांचा प्रश्न आहे. यासोबत ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचाही प्रश्न आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर नोकरभरतीत अन्याय होता कामा नये, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली आहे. मराठा आरक्षण वगळता ओबीसीच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नाबाबत मधला मार्ग काढण्याची गरज आहे, असं दरेकर यांनी म्हटल आहे.

 

मागे

भारत बायोटेक'ची कोरोना प्रतिबंधक लस 2021च्या मार्चनंतर येण्याची शक्यता, काय असेल किंमत?
भारत बायोटेक'ची कोरोना प्रतिबंधक लस 2021च्या मार्चनंतर येण्याची शक्यता, काय असेल किंमत?

भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र....

अधिक वाचा

पुढे  

ठाकरे सरकारचा 15 मोठ्या कंपन्यांसोबत करार; 35 हजार कोटींची गुंतवणूक, 24 हजार रोजगारांचा दावा
ठाकरे सरकारचा 15 मोठ्या कंपन्यांसोबत करार; 35 हजार कोटींची गुंतवणूक, 24 हजार रोजगारांचा दावा

कोरोना विषाणूचे संकट आणि लॉकडाऊननंतर महाराष्ट्र सरकारने आता राज्यात गुंत....

Read more