ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2020 11:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर

शहर : देश

कोरोना विषाणूची नवीन प्रजाती आढळून आल्यानंतर ब्रिटन येथून आलेले तब्बल 20 जण (New Corona Strain 20 Tested For COVID-19 Positive) कोरोना संक्रमित असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारत सरकारने युकेहून (UK) येणाऱ्या लोकांसाठी कठोर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये विमानतळावर प्रत्येकाची RT-PCR चाचणी करणे अनिवार्य असेल. निती आयोगचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल यांनी मंगळवारी सांगितलं, की याबाबत घाबरण्याची गरज नाही. पण आणखी सतर्क राहण्याची गरज आहे.

“भारतात आतापर्यंत याप्रकारचा विषाणू आढळून आलेला नाही आणि त्याच्या स्वरुपातही कुठला महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणुच्या (SARS-CoV-2 Strain) नव्या स्वरुपाने लशीच्या विकासावर कुठलाही परिणाम पडणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

भारताने 23-31 डिसेंबरपर्यंत ब्रिटन येथून येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. ब्रिटन येथून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर पाळत ठेवली जाणार आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या 20 पॉझिटिव्ह लोकांमध्ये सोमवारी रात्री दिल्लीत लँड करणाऱ्या 6, रविवारी रात्री कोलकाता येथे येणाऱ्या 2, मंगळवारी अहमदाबाद येथे येणाऱ्या 4 आणि आज अमृतसरला आलेल्या एका क्रू मेंबरचा समावेश आहे. हे सर्व लोक एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून भारतात आले होते.

विषाणूचं रुप बदलल्याने याच्या उपचारासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विशेषत: देशात तयार करण्यात येणाऱ्या लसींवर (Corona Vaccine) याचा काहीही परिणाम होणार नाही. पॅटर्न बदलल्यामुळे व्हायरस अधिक संक्रामक होऊ शकतो. यामुळे जलद गतीने संसर्ग पसरण्याची शक्यता आहे, असं व्ही के पॉल यांनी सांगितलं.

हे देखील सांगितलं जात आहे की आता हा विषाणू 70 पट जास्त संसर्ग पसरवतो. त्यामुळे एका प्रकारे याला ‘सुपर स्प्रेडर म्हणू शकतो. पण, यामुळे मृत्यू, रुग्णालयात भर्ती होणे किंवा खूप आजारी पडणे याचा धोका वाढत नाही. चिंतेची बाब म्हणजे तो लोकांमध्ये अधिक जलद गतीने संसर्ग पसरवतो.” याबाबत व्ही. के. पॉल यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, नियमांचं काटेकोरपणे पालन करा, असं आवाहन त्यांनी केलं.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

मार्गदर्शक सूचना भाग 1

यूकेमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आले आहे.

जे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळतील त्यांना विलगीकरण कक्षात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या नमुन्याचे जिनोमिक सिक्वेंन्सिंग करण्यासाठी नॅशनल इनस्टिट्युट ऑफ वायरोलॉजी, पुणे येथे पाठवण्यात येईल.

पॉझिटिव्ह व्यक्ती पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आणि त्याच्या नमुन्यामध्ये नवा वेरियंट न आढळल्यास प्रचलित पद्धतीनं कोरोना रुग्णावर उपचार करण्यात येतील.

जिनोमिक सिक्वेन्सिंगमध्ये नवीन वेरियंट आढळ्यास त्यावर प्रचलित पद्धतीनं उपचार केला जाईल. मात्र, त्या व्यक्तीची 14 दिवसांनंतर टेस्ट केली जाणार आहे. 14 व्या दिवसांनंतर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यानंतर सलग दोन चाचण्या निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत कोरोना चाचणी केली जाणार आहे.

आरटीपीसीआर टेस्टमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या घरी क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

विमान वाहतूक कंपन्यांना प्रवाशांना प्रवासापूर्वीच या सर्व मार्गदर्शक सूचनांची माहिती द्यावी लागणार आहे. प्रवासादरम्यान याची घोषणा केली जाईल आणि विमानतळावर वेटिंग रुममध्ये या गाईडलाईन लावाव्या लागणार आहेत. (Central Health Ministry issued guidelines on the wake of new corona virus strain)

मार्गदर्शक सूचना भाग 2

 21 ते 23 डिसेंबर दरम्यान यूकेमधून आलेल्या आणि आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांना एका वेगळ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. आसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणं कोरोना चाचणी केली जाईल.

कोरोना संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीच्या 3 सीट पुढे आणि 3 सीट मागे बसले असले असतील ते ग्राह्य धरले जातील. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या केबिन क्रूच्या सदस्यांची देखील माहिती घेतली जाणार आहे.

21 ते 23 डिसेंबर दरम्यान यूकेमधून आलेल्या आणि आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व राज्यांना देण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे प्रवाशांना होम क्वारंटाईन केले जाईल. आसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणं कोरोना चाचणी केली जाईल.

25 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान जे प्रवासी भारतात आले आहेत त्यांची माहिती जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्यांना दिली जाईल. जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशांना सूचना देणे आवश्यक आहे. प्रवाशांमध्ये असे लक्षण आढळल्यास त्यांची तातडीने आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यामध्ये नवे वेरियंट आढळतात हे पाहावे लागणार आहे.

मागे

जवान सुजित किर्दत, जवान नागनाथ लोभेंचं पार्थिव मूळगावी रवाना, पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी
जवान सुजित किर्दत, जवान नागनाथ लोभेंचं पार्थिव मूळगावी रवाना, पुणे विमानतळावर लष्कराकडून सलामी

सीयाचीन भागात झालेल्या अपघातात निलंगा तालुक्यातील उमरगा येथील जवान नागना....

अधिक वाचा

पुढे  

ममता बॅनर्जींना आणखी मोठा झटका? ‘यामंत्र्यांनी बैठकीला दांडी मारल्याने उलटसुलट चर्चांना उधाण
ममता बॅनर्जींना आणखी मोठा झटका? ‘यामंत्र्यांनी बैठकीला दांडी मारल्याने उलटसुलट चर्चांना उधाण

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे येथे राजकीय हालचालींना चां....

Read more