ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Digital India : पासपोर्ट काढण्यासाठी ओरिजनल सर्टीफिकेटची गरज नाही, सुरु झाली 'ही' सुविधा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 20, 2021 06:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Digital India : पासपोर्ट काढण्यासाठी ओरिजनल सर्टीफिकेटची गरज नाही, सुरु झाली 'ही' सुविधा

शहर : देश

केंद्र सरकारने पासपोर्ट काढण्यासाठी कागदपत्रांची कटकट कमी केली आहे. त्यामुळे आता पासपोर्ट काढणे अधिक सोपे झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट सेवा कार्यक्रमासाठी (Passport Seva Programme) डिजीलॉकर प्लॅटफॉर्मचे (DigiLocker Platform) उद्घाटन केले. ही सुविधा सुरू झाल्याने पासपोर्ट तयार करणार्‍यांना अर्जाच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे दाखवाली लागणार नाहीत. डिजीलॉकर प्रोग्रामद्वारे संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

डिजिटलायझेनच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले आहे. आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पुढाकर घेत पासपोर्ट सेवा आणखी सोपी करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आता पासपोर्ट सेवा प्रोग्राममध्ये डीजीलॉकर ही नवी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी या नव्या योजनेचे उद्घाटन केले आहे. पासपोर्ट घेणाऱ्यांसाठी ही सुविधा अतिशय सोपी आहे. त्यामुळे याचा निश्चित फायदा होईल, असे मत परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन  (V Muraleedharan) यांनी यावेळी व्यक्त केले.

पासपोर्ट काढणार्‍यांच्या संख्येत वाढ

मंत्री मुरलीधरन यांच्या म्हणण्यानुसार, पासपोर्ट सेवा कार्यक्रम हा देशातील पासपोर्ट सेवांच्या विस्तारामध्ये मोठा बदल आहे. यामुळे पासपोर्ट तयार करणार्‍यांना मोठी सोय होईल. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या सहा वर्षांत पासपोर्ट (passport) काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दर महिन्याला पासपोर्टसाठी अर्ज करणार्‍यांची संख्या वाढत आहे. 2017 मध्ये प्रथमच एका महिन्यात 10 लाखाहून अधिक लोकांनी अर्ज केले.

नागरिकांच्या सोयीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. एकीकडे पासपोर्टचे नियम मोठ्या प्रमाणात सोपे आणि सुटसुटीत केले गेले आहेत तर दुसरीकडे घराजवळही पासपोर्ट बनण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू केली गेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 426 पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK) कार्यान्वित झाली आहेत आणि लवकरच यात आणखी भर पडणार आहे. देशात पासपोर्ट बनविण्यासाठी एकूण 555 ठिकाणाहून पासपोर्ट तयार केले जात आहेत.

ई-पासपोर्टवरही काम सुरू

कोरोना कालावधीत नागरिकांची सुरक्षा वाढवण्यासाठी, देशात ई-पासपोर्ट बनवण्याची प्रक्रियाही सुरू आहे. लवकरच ई-पासपोर्ट सुविधा सुरू केली जाईल. याशिवाय पुढील माहिती ई-पासपोर्टद्वारे सुरक्षित ठेवली जाईल. डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत, प्रत्येक सेवेचे डिजिटायझेशन केले जात आहे, जेणेकरून लोकांना घराघरात सुविधा मिळू शकेल.

डीजीलॉकर सिस्टम काय आहे ?

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या माध्यमातून डिजिटल इंडिया प्रोग्रोम अंतर्गत परराष्ट्र मंत्रालयाने डीजीलॉकर सिस्टम सुरु केली आहे. नागरिकांना पासपोर्ट काढताना, जास्तीत जास्त सोयीस्कर व्हावे, यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये नव्याने पासपोर्ट काढणाऱ्यांना तर लाभ होणारच आहे. पण, पासपोर्ट हरवला किंवा नव्याने काढण्यात येणार असले तर, डीजीलॉकर सिस्टम सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे, असा दावा पराराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

डीजीलॉकर सिस्टमचे फायदे

पासपोर्ट काढताना नागरिकांना पेपरलेस पद्धतीने कागदपत्रे जमा करता येणार आहेत. पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रे मूळ घेऊन जाण्याची गरज भारणार नाही. डीजीलॉकरमधील वॉयलेटमधील कागदपत्रे ओरिजनल म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत. पासपोर्टची व्यवस्था डिजिटल करण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल असणार आहे. पासपोर्ट हरवला किंवा गहाळ झाल्यास नवा पासपोर्ट घेताना, कागदपत्रांची कटकट असणार नाही. त्यासाठी डीजीलॉकर महत्वाची भूमिका बचावणार आहे.

मागे

SBI च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, आता आधार लिंक बंधनकारक, अन्यथा मोठे नुकसान
SBI च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी, आता आधार लिंक बंधनकारक, अन्यथा मोठे नुकसान

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI ) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता आधार लिं....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत
राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर रा....

Read more