ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

घरातून बाहेर पडल्यास गोळी मारण्याचे आदेश देऊ, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा कठोर इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 25, 2020 12:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

घरातून बाहेर पडल्यास गोळी मारण्याचे आदेश देऊ, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा कठोर इशारा

शहर : देश

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेनंतर लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी तेलंगणा सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. “नागरिकांनी घराबाहेर पडल्यास दिसताचक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ”, असा कठोर इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव  यांनी दिला.

“लॉकडाऊन दरम्यान कुणी घराच्या बाहेर पडल्यास गोळ्या घालण्याचे आदेश देऊ. लष्कर बोलावून संचारबंदी लावण्यात येईल”, असा कठोर इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची चर्चा सुरु आहे.

“राज्यातील नागरिकांनी राज्याबाहेर जाऊ नये. तसेच कुणीही रस्त्यावर उतरु नका. कुणाला काही अडचण असेल तर 100 नंबरवर कॉल करा. पोलीस तुमच्या घरी येऊन तुम्हाला मदत करतील. नागरिकांनी राज्य सरकारला सहकार्य करा. जर कुणी सूचनांचे पालन केले नाही तर सैन्याला बोलावून गोळी मारण्याचे आदेश आम्हाला द्यावे लागतील”, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

“परदेशातून परतल्यानंतर ज्यांना क्वारंटाईन करण्यास सांगितले असून जे क्वारंटाईन झाले नाहीत, अशा लोकांचे पासपोर्ट जप्त करा. राज्यात 36 कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या आहे. तर 19313 लोकांवर सरकारची नजर आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांची संख्या देशात 10 झाली आहे. तर राज्यात एकूण 500 च्या वर लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या सर्वांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परदेशातील आलेल्या अनेक नागरिकांना क्वारंटाईन करुन त्यांच्यावर सरकारची नजर आहे.

मागे

कोरोनाने घेतला आणखी एक बळी,आतापर्यंत ११ जणांचा बळी
कोरोनाने घेतला आणखी एक बळी,आतापर्यंत ११ जणांचा बळी

कोरोना व्हायरसमुळे देशात आणखी एकाचा बळी गेला आहे. आतापर्यंत देशात ११ जणांन....

अधिक वाचा

पुढे  

सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण
सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या सांगली....

Read more