ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जाहले श्रीराम विराजमान… मंत्रोच्चार, शंख नादात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 22, 2024 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जाहले श्रीराम विराजमान… मंत्रोच्चार, शंख नादात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

शहर : देश

पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी... शंखनाद आणि जय श्रीरामच्या घोषात आज प्रभू श्रीरामाचं अयोध्या नगरीत आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं.

पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी शंखनाद आणि जय श्रीरामच्या घोषात आज प्रभू श्रीरामाचं अयोध्या नगरीत आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही सुरू होत्या. आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळेभरून पाहिला. हा सोहळा पाहताना हजारो डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ऊर अभिमानने भरून आला. अन् मनामनातून जय श्रीरामचा जयघोष निनादला

पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी राम मंदिरात दाखल झाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरात अनुष्ठान पार पडले. स्वत: मोदीही मंत्रांचे पठन करत होते. हा मंत्रोच्चार आणि शंखनाद सुरू असताना पंतप्रधान मोदी अत्यंत भावूक झाले होते.

 

मागे

मुंबईच्या लोकलपासून विमानापर्यंत राम नावाचा गजर, भजनांमध्ये रंगले प्रवाशी
मुंबईच्या लोकलपासून विमानापर्यंत राम नावाचा गजर, भजनांमध्ये रंगले प्रवाशी

देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्याच....

अधिक वाचा

पुढे  

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीराम यांच्या मूर्तीची पहिले दर्शन
अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर श्रीराम यांच्या मूर्तीची पहिले दर्शन

अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या 500 वर्षांचा वनवास आज संपला. दुपारी 12.29 मिनि....

Read more