ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रभात कॉलनी शाळेतील गुणवंतांचा सन्मान, गर्जा हिंदुस्तानच्यावतीने विद्यार्थ्यांचे कौतुक

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 22, 2019 08:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रभात कॉलनी शाळेतील गुणवंतांचा सन्मान, गर्जा हिंदुस्तानच्यावतीने विद्यार्थ्यांचे कौतुक

शहर : मुंबई

दहावीच्या परिक्षेत सर्वोत्तम गुणांनी उत्तिर्ण झालेल्या प्रभात कॉलनी महानगरपालिका शाळेतील 70 टक्क्याहून अधिक गुण पटकावलेल्या गुणवंताचा शाळेच्यावतीने सन्मान शनिवारी करण्यात आला. शाळेतच आयोजित या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रदीप राठोड तर विशेष अतिथी म्हणून गर्जा हिंदुस्तानचे संपादक दयानंद मोहिते यांची उपस्थिती होती.


यावेळी निखिल किंजळकर (77 टक्के), मयुर शिंदे (76 टक्के) आणि तनया बोरनाक (71 टक्के) या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आर्थिक, शारिरीक आणि सामाजिक अडचणींवर मात करत शालेय शिक्षण नेटाने पूर्ण करतानाच दहावीच्या वर्गात 70 टक्क्याहून अधिक गुण संपादन करणार्‍या तीन विद्यार्थ्यांचे गर्जा हिंदुस्तानच्यावतीने दयानंद मोहिते यांनी विशेष कौतुक केले. गर्जा हिंदुस्तान परिवार या आणि अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी सदैव असून, विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक यश साध्य करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन पुढील वर्षी अधिक विद्यार्थी घवघवीत यश मिळवतील असा विश्वास यावेळी प्रदीप राठोड यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सीमा कारंडे यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि पालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. 

मागे

'व्हीआयपींना वाचवतात स्नायफर'; महिला आयपीएस अधिकाऱ्याचं राहुल गांधींना प्रत्युत्तर
'व्हीआयपींना वाचवतात स्नायफर'; महिला आयपीएस अधिकाऱ्याचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशी राहुल गांधींनी केलेलं एक ट्विट वादात सा....

अधिक वाचा

पुढे  

पाकिस्तानचे घूमजाव; आता म्हणतात उड्डाणपूल नको फक्त रस्ताच बांधा
पाकिस्तानचे घूमजाव; आता म्हणतात उड्डाणपूल नको फक्त रस्ताच बांधा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात करतारपूर कॉरिडोअरवरून वाद निर्माण होण्याची श....

Read more