ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यामध्ये भीषण आग; पाच कामगारांचा मृत्यू 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 12:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यामध्ये भीषण आग; पाच कामगारांचा मृत्यू 

शहर : पुणे

पुण्यातील देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला गुरुवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत राकेश रियाड (24), राकेश मेघवाल (20), धर्माराम बडियासर (24), सूरज शर्मा (25) सर्व राजस्थान आणि लातूरचा गोपाल चांडक (23) या पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.
पहाटे आग लागली त्यावेळी पाच कामगारांपैकी राकेश सुखदेव रियाड या कामगाराने दुकान मालक भवरलाल हरीलाल प्रजापती यांना फोन केला. दुकानाला आग लागली असून साहेब आम्हाला बाहेर काढा, असे राकेशने प्रजापती यांना सांगितले. राकेशच्या फोननंतर प्रजापतींनी तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली आणि ते देखील दुकानाच्या दिशेने निघाले. काही वेळातच अग्निशमन दलाचे बंब आणि प्रजापती हे दोघेही घटनास्थळी पोहोचले.
पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. दुकानाच्या आत जाणे शक्य नव्हते. परिस्थिती लक्षात घेता अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूस भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोवर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. कामगारांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर प्रजापती यांना राकेशचा शेवटचा फोन आठवला आणि त्यांना अश्रू आवरता आले नाही .

 

मागे

बाईकमध्ये अडकलेल्या ओढणीने बालिकेचे शीर धडावेगळे झाले
बाईकमध्ये अडकलेल्या ओढणीने बालिकेचे शीर धडावेगळे झाले

बाईकच्या चेनमध्ये ओढणी अडकल्याने एका सहा वर्षाच्या बालिकेच्या गळ्याला फा....

अधिक वाचा

पुढे  

पाकिस्तानची नौटंकी उघड; एअरस्ट्राइकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानची नौटंकी उघड; एअरस्ट्राइकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा

इंडियन एअरफोर्सने  26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये केलेल्....

Read more