ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राहुल गांधींनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 01:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राहुल गांधींनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज

शहर : देश

उत्तर प्रदेशातील अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बुधवारी रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीसाठी अमेठीतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत रॉबर्ट वधेरा, प्रियांका गांधी वधेरा, त्यांचा मुलगा रेहान, मुलगी मिराया  ही सोबत होत्या. रोड शोला मोठी प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. त्यानंतर अर्ज भरताना त्यांच्या सोबत सोनिया गांधी देखील होत्या. राहुल गांधी यांनी दोन किलोमीटर रोड शो  करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.  
अमेठी मतदारसंघात लोकसभेच्या 18 निवडणुका झाल्या. त्यामध्ये काँग्रेसचा दोनदा पराभव झाला असून 16 वेळा येथील जागा जिंकली आहेत. या ठिकाणी सपा- बसपाने उमेदवार उभा केला नाही. भाजपने स्मृती इराणी यांना येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे राहुल विरुद्ध स्मृती अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. 2014 मधील निवडणुकीत राहुल यांनी स्मृती इराणींचा  दारूण पराभव केला होता.

मागे

जपानमधील मिसवा हवाई दलातील लढाऊ विमान बेपत्त्ता
जपानमधील मिसवा हवाई दलातील लढाऊ विमान बेपत्त्ता

जपानमधील मिसवा येथील हवाई तळावरून उड्डाण घेतलेले एक लढाऊ विमान सरावादरम्य....

अधिक वाचा

पुढे  

दहशतवादला प्रोत्साहन देणार्‍या  यासिन मलिकला 'एनआयए'कडून अटक
दहशतवादला प्रोत्साहन देणार्‍या यासिन मलिकला 'एनआयए'कडून अटक

दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविल्या  प्रकरणी (टेरर फंडिंग) राष्ट्रीय तप....

Read more