ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रेल्वेच्या तिकीटदरात वाढ पण मुंबईकरांना दिलासा

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 12:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रेल्वेच्या तिकीटदरात वाढ पण मुंबईकरांना दिलासा

शहर : देश

        नववर्षांच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे प्रवास महाग झाला आहे. उपनगरी रेल्वेला या भाडेवाढीतून वगळण्यात आले असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अन्य सर्व प्रकारच्या रेल्वे भाडय़ांमध्ये प्रति किलोमीटर एक ते चार पैसे वाढ करण्यात आली आहे.


       रेल्वेच्या तिकीटदरात वाढ करण्याचे सूतोवाच गेल्या आठवडय़ात रेल्वे मंत्रालयाने केले होते. देशातील गरीब-कनिष्ठ आर्थिक गटातील प्रवाशांसाठी रेल्वे अत्यंत सोयीची असल्याने रेल्वेने प्रवासी भाडेवाढ केलेली नव्हती.


        यापूर्वी २०१४-१५ मध्ये प्रवासभाडे वाढण्यात आले होते. रेल्वेने वेळोवेळी प्रवाशांच्या सोयीसुविधांचा विस्तार केला आहे. त्या कायम ठेवण्यासाठी रेल्वे भाडेवाढ करणे अपरिहार्य असल्याचे मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

     सामान्य विनावातानुकूलित रेल्वेगाडय़ांसाठी प्रति किलोमीटर एक पैसा, एक्स्प्रेस विनावातानुकूलित रेल्वेगाडय़ांसाठी प्रतिकिलोमीटर दोन पैसे, तर वातानुकूलित प्रवासासाठी प्रति किलोमीटर चार पैसे वाढवण्यात आले आहेत.


   शताब्दी, राजधानी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, गरीबरथ, गतिमान, जनशताब्दी, राज्य राणी, युवा एक्स्प्रेस, सुविधा, मेमू या रेल्वेगाडय़ांचा प्रवासही महाग झाला आहे. आरक्षण शुल्क, उपकर, आदींमध्ये बदल झालेला नाही. वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार वस्तू व सेवा कर बदलेल.

मागे

१३९ क्रमांक आता ‘रेल मदत’ या अॅ पच्या माध्यमातून वापरता येणार
१३९ क्रमांक आता ‘रेल मदत’ या अॅ पच्या माध्यमातून वापरता येणार

            रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू असलेले अनेक हेल्पलाइ....

अधिक वाचा

पुढे  

वर्षाच्या पहिल्या दिवशीच गॅस दर वाढले
वर्षाच्या पहिल्या दिवशीच गॅस दर वाढले

         नवी दिल्ली - पेट्रोलियम कंपन्यांनी  गॅस सिलिंडरच्या दरात तब्....

Read more