ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोकण, गोव्यात धुवाधार पावसाचा अंदाज; मच्छिमारांना धोक्याचा इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 11, 2019 07:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोकण, गोव्यात धुवाधार पावसाचा अंदाज; मच्छिमारांना धोक्याचा इशारा

शहर : पुणे

मान्सूच्या आगमनाची सर्वजण वाट पाहत आहेत. दरम्यान, उद्या दि. १२ जून रोजी कोकण, गोव्यात धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, पावसासह जोरदार वारा असेल त्यामुळे मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असा धोक्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मान्सून हा १४ तारखेनंतर राज्यात सक्रीय होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण असेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

१२ जूनला कोकण आणि गोव्यात धुवाधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईतही हीच स्थिती असेल. १२ जूनला कोकण, गोवा परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने प्रत्येकांना खबरदारी घ्यावी. तसेच मासेमारी करण्यासाठी १२ जूनला समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, 'वायू' वादळामुळे मान्सूनची प्रगती थांबली आहे.

१२ जूनला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ७० किमीपर्यंत असेल. तसेच वाऱ्याच्या वेगात वाढ होणार असून ताशी १२० ते १३५ किमीच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी १३५ किमीपर्यंत असेल.

वायू' हे वादळ १३ जूनला धडकेल असा अंदाज आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये १३ जूनला 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 'वायू' वादळामुळे मान्सूनची प्रगती थांबल्याने पाऊस केरळच्या पुढे सरकलेला नाही. १४ तरखेनंतरच मान्सून पुढे सरकेल. महाराष्ट्रमध्ये मात्र पाऊस पडेल. हा पाऊस मान्सूनचा नसला तरीही 'वायू' वादळाच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात १३ तारखेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज, पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

 

मागे

योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, पत्रकाराला सोडून देण्याचे आदेश
योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, पत्रकाराला सोडून देण्याचे आदेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबा....

अधिक वाचा

पुढे  

रत्नागिरी, गुजरातला 'वायू' चक्रीवादळाचा धोका, सुरक्षा यंत्रणा 'हायअलर्ट'वर
रत्नागिरी, गुजरातला 'वायू' चक्रीवादळाचा धोका, सुरक्षा यंत्रणा 'हायअलर्ट'वर

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वायू चक्रीवादळ गुजरा....

Read more