ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

थातूरमातूर बोलू नका, सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या; राम कदम यांचं राऊतांना आव्हान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2020 10:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30

थातूरमातूर बोलू नका, सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या; राम कदम यांचं राऊतांना आव्हान

शहर : मुंबई

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दस्ताऐवज दाखवून आरोप केला आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्रागा करून घेऊ नये. थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका. सोमय्यांच्या आरोपांना उत्तरं द्या, असं आव्हान भाजपचे आमदार राम कदम यांनी राऊत यांना दिलं आहे. राम कदम यांनी ‘टीव्ही 9 मराठीशी बोलताना हे आव्हान दिलं आहे. संजय राऊत का त्रागा करून घेत आहेत माहीत नाही. सोमय्या यांनी कागदपत्रांच्या आधारे आरोप केला आहे. त्यावर राऊतांनी बोललं पाहिजे. सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. थातूरमातूर उत्तरं देऊ नये, असं सांगतानाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर कुणी हा प्रश्नही उपस्थित केला नसता. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जमिनीचे 21 व्यवहार केलेत की नाही ते राऊतांनी सांगावं, असं कदम म्हणाले.

राऊत यांच्याबद्दल मला व्यक्तीगत खूप आदर आहे. पण आता माध्यमांशी बोलताना त्यांनी सोमय्यांच्या एका तरी आरोपाचं उत्तर दिलं आहे का?, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात आर्थिक हितसंबंध होते. त्यांच्यात जमिनीचा व्यवहार झाला होता, असा गंभीर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलेच फटकारले आहे. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी फडफड करत आहेत. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. मात्र, किरीट सोमय्या यांनी कितीही फडफड केली तरी त्यामधून काही निष्पन्न होणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

मागे

राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध!निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप
राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध!निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप

अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या निर्मितीवरुन आता नवा वाद उभा राहिला आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

कोव्हीशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण
कोव्हीशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण

कोव्हीशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाल्याच....

Read more