ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी महाराष्ट्राचा असा सन्मान, एकमेव महिलेस…

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 19, 2024 12:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी महाराष्ट्राचा असा सन्मान, एकमेव महिलेस…

शहर : पुणे

महाराष्ट्राचा अनोखा सन्मान झाला आहे. महाराष्ट्रातील महिला कीर्तनकारास राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राज्यात पाच महिला साधवी आहेत. त्यातील पुणे येथील सुप्रियाताई साठे ठाकूर यांना पुजेचा मान दिला आहे.

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास तीन दिवस राहिले आहेत. या सोहळ्याची निमंत्रणे देशभरातील प्रमुख लोकांना दिली गेली आहे. विदेशातून अनेक जणांची उपस्थिती या सोहळ्यास राहणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचा अनोखा सन्मान झाला आहे. महाराष्ट्रातील महिला कीर्तनकारास या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राज्यात पाच महिला साधवी आहेत. त्यातील पुणे येथील सुप्रियाताई साठे ठाकूर यांना पुजेचा मान दिला आहे. तसेच देशभरात अकरा दाम्पत्यांना पूजेसाठी बोलवण्यात आले आहे. त्यात नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे.

खेड तालुक्यातील महिलेचे सन्मान

आयोध्या येथील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्रातून महिला कीर्तनकार म्हणून उपस्थित राहण्याचा मान पुण्याच्या खेड तालुक्यातील कीर्तनकार महिला सुप्रियाताई साठे ठाकूर यांना मिळाला आहे. राज्यात पाच साधवी महिला असून यातून सुप्रियाताई साठे ठाकूर या एकमेव पूजेचा मान मिळणाऱ्या कीर्तनकार महिला आहेत. पुणे ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्या भूमीतील महिलेस हा मान मिळाला आहे.

हा आपल्यासाठी सौभाग्याचा विषय

पाचशे वर्षांपासून आपण ज्याची वाट पाहत होतो, तो क्षण आता जवळ आला आहे. त्या क्षणाचा आपणास भागिदार होता येत आहे, हा आपल्यासाठी सौभाग्याचा विषय आहे. आपणास आमंत्रण मिळाल्यानंतर खूप आनंद झाला. ज्ञानबो, तुकाराम आणि मुक्ताईंची माझ्यावरती कृपी आहे. या संतांच्या कृपेने हा मान आपणास मिळाला असल्याची भावना साठे ठाकूर यांनी व्यक्त केली.

नवी मुंबईतील कांबळे कुटुंबाला मान

नवी मुंबईतील कांबळे कुटुंबाला अयोध्येत श्रीरामाची पूजा करण्याचा मान मिळाला आहे. विठ्ठल कांबळे उज्वला कांबळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पूजा करणार आहे. त्यासंदर्भात त्यांना मला फोन आला आहे. विठ्ठल कांबळे हे मुख्यधापक आहेत. या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यात मोदींसह 11 दाम्पत्य पूजा करणार आहेत.

मागे

कायद्यानुसार एका व्यक्तीकडे किती जमीन असू शकते? महाराष्ट्रात काय नियम?
कायद्यानुसार एका व्यक्तीकडे किती जमीन असू शकते? महाराष्ट्रात काय नियम?

आपल्याकडे असणारा जमिनीता भाग कायदेशी आहे की बेकायदेशीर? कायद्याच्याच तरतु....

अधिक वाचा

पुढे  

क्रिकेटची फायनल जिंकण्यापूर्वीच मृत्यूने त्यांना हरवलं, 3 दोस्तांचा वेदनादायक मृत्यू ..
क्रिकेटची फायनल जिंकण्यापूर्वीच मृत्यूने त्यांना हरवलं, 3 दोस्तांचा वेदनादायक मृत्यू ..

गावातीलच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहभागी होण्यासाठी ते तिघे एक....

Read more