ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पीएमसी बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 14, 2019 07:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पीएमसी बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

शहर : मुंबई

भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली. त्यामुळे आता खातेधारकांना दिवसाला बँकेतून ४० हजार रुपये काढता येतील. यापूर्वी ही मर्यादा २५ हजार इतकी होती.काही दिवसांपूर्वी पीएमसी बँकेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यामुळे पीएमसीला रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवानगीशिवाय कर्ज वितरणाला, नवीन गुंतवणूक करण्याला किंवा निधी मिळवून दायित्व वाढविता येणार नाही. त्याचप्रमाणे नव्याने ठेवी स्वीकारण्याला, तसेच ठेव वठविणे, देणी चुकती करण्याला आणि आपल्या कोणत्याही स्थावर मालमत्ता व संपत्तीची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य मार्गाने विल्हेवाटीवर बंदी आली आहे.

मागे

खड्ड्यांमुळे आणखी एक बळी, मुंबईतील महिलेचा मृत्यू
खड्ड्यांमुळे आणखी एक बळी, मुंबईतील महिलेचा मृत्यू

पूर्व द्रुतगती मार्ग आणि ऐरोलीला जोडणाऱ्या लिंक रोडवर खड्ड्यांमुळे आणखी ए....

अधिक वाचा

पुढे  

अनधिकृत इमारतीचा काही भाग कोसळल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू
अनधिकृत इमारतीचा काही भाग कोसळल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

विरार पूर्वेकडील कोपरी भागातील अनधिकृत इमारतीचा काही भाग कोसळल्यानं झाले....

Read more