ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आता लवकरच 20 रुपयांची नोट बाजारात

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 05:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आता लवकरच 20 रुपयांची नोट बाजारात

शहर : delhi

आता 10 रुपयेच्या नोटीनंतर बाजारात 20 रुपयाची नवीन नोट येणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून लवकरच 20 रुपयांची नवी नोट जारी करण्यात येणार आहे. नवीन वैशिष्ट्ये आणि नव्या रंगातील ही नोट चलनात येणार आहे. या नोटेचा फोटो आणि वैशिष्ट्ये याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. या नव्या नोटेचा रंग हिरवट पिवळा असेल. या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. या नोटेच्या मागील बाजूस हिंदुस्थानचा सांस्कृतिक वारसा असलेल्या वेरुळ लेणींचे चित्र असेल. खरी नोट ओळखता यावी यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा आणि खुणांचा वापर या नोटेवर करण्यात आला आहे. तसेच 20 रुपयांच्या आताच्या नोटाही चलनात राहणार आहेत.
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटांसह 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. आता लवकरच 20 रुपयांची नवी नोट चलनात येणार आहे.

 

मागे

शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटेंची वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटेंची वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

मुंबईवरील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेले पोलीस अधि....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रात अजून तीन दिवस उकाडा राहणार कायम
महाराष्ट्रात अजून तीन दिवस उकाडा राहणार कायम

मुंबईसह महाराष्ट्रात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, अजून तीन दिव....

Read more