ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

’मंत्रीजी आपण 7 वर्षे लेट आहात’ रितेश देशमुखांची पीयूष गोयल यांच्यावर टीका

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 03:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

’मंत्रीजी आपण 7 वर्षे लेट आहात’ रितेश देशमुखांची पीयूष गोयल यांच्यावर टीका

शहर : मुंबई

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर आरोप करणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना अभिनेता रितेश देशमुखने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. माझे वडील कधीही मला चित्रपटांमध्ये भूमिका मिळवून देण्यासाठी कुणालाही बोलले नाहीत, असे रितेशने म्हटले आहे. रितेशने आपल्या ट्विटरवरून ट्विट करत स्पष्ट केले आहे. 
रितेशने ट्विटमध्ये लिहिले आहे, होय, हे खरे आहे की, मी माझ्या वडिलांसोबत ताज ओबेरॉय हॉटेलला गेलो होतो. परंतु, गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्याच्यावेळी आम्ही तेथे होतो, ही गोष्ट खोटी आहे. त्यांनी मला चित्रपटात रोल मिळवून देण्याचा प्रयत्न केला, ही बाब खोटी आहे. माझ्या वडिलांनी कधीही कुठल्याही दिग्दर्शक किंवा निर्मात्याकडे मला रोल मिळवून देण्यास गळ घातली नाही आणि मला यावर गर्व आहे. ताज ओबेरॉय हॉटेलमध्ये आपण गेलो होतो, मात्र हल्ल्यावेळी आम्ही त्या ठिकाणी नव्हतो, असे रितेशने स्पष्ट केले. मंत्रीजी, आपण 7 वर्षे लेट आहात. त्यावेळी तुम्ही असे आरोप केले असते तर विलासराव देशमुख यांनी आपल्याला उत्तरही दिले असते, असे रितेशने ट्विटमध्ये लिहिले आहे.
पियुष गोयल यांनी आरोप केला होता की, मुंबई हल्ल्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपला मुलगा रितेश देशमुखला चित्रपटात भूमिका मिळवून देण्यात मशगूल होते. गोयल यांच्या या आरोपानंतर रितेशने ट्विट करत स्पष्ट केले आहे. मात्र, रितेशने गोयल यांचे नाव कुठेही घेतलेले नाही.

मागे

जम्मू - काश्मीरमध्ये विद्यार्थी-सुरक्षा दल आमने-सामने
जम्मू - काश्मीरमध्ये विद्यार्थी-सुरक्षा दल आमने-सामने

श्रीनगरमध्ये विद्यार्थी आणि सुरक्षा दल आमने-सामने आले. शहरातील अमरसिंग कॉल....

अधिक वाचा

पुढे  

मुुंबईत लिफ्ट दुरुस्ती करताना तोल गेल्याने मॅकेनिकचा मृत्यू
मुुंबईत लिफ्ट दुरुस्ती करताना तोल गेल्याने मॅकेनिकचा मृत्यू

दुरुस्तीचे काम सुरू असताना तोल गेल्याने लिफ्टवरून खाली पडून मॅकेनिकचा मृत....

Read more