ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई हायजवळ ‘रोहिणी’ नौकेला भीषण आग, तीन खलाशी बेपत्ता

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 14, 2021 02:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई हायजवळ ‘रोहिणी’ नौकेला भीषण आग, तीन खलाशी बेपत्ता

शहर : मुंबई

मुंबई हायजवळ ‘रोहिणी या नौकेला काल रात्री 8.50 ला मोठी आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. ही आग इतकी मोठी होती की इंजिन रूमनेही पेट घेतला. यामद्ये तीन खलाशी बेपत्ता असून एक गंभीर जखमी असल्याची माहीती देण्यात आली आहे. अधिक माहितीनुसार, जखमी खलाशाला ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरने मुंबईत आणण्यात आलं असून त्याला रुग्णालयात ऊपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Rohini boat catches fire near Mumbai High three sailors are missing)

मिळालेल्या माहितीनुसार, यामधून काही जणांना दुसऱ्या नौकेने रोहीनी या बोटीतून रेस्कू करण्यात आलं. मुंबईपासून 92 मैल सागरी अंतरावर ओएनजीसीची बॉम्बे हायअंतर्गत विस्तारित तेलविहीर आहे. या तेलविहिरीजवळ काम करणाऱ्या ‘रोहिणी या नौकेला शनिवारी आग लागली. त्यानंतर नौकेतील अधिकाऱ्यांनी तटरक्षक दलाच्या वरळीतील केंद्राकडे मदतीची विनंती केली. यावेळी ‘अल्बाट्रॉस हे व्यापारी जहाज जवळच होते. त्या जहाजाला तत्काळ घटनास्थळी जाण्याची विनंती तटरक्षक दलाने केली.

या जहाजाने दोरखंडाचा उपयोग करीत ‘रोहिणी नौकेला तेथून सुरक्षितस्थळी हलवले. याचदरम्यान तटरक्षक दलाने विशेष टेहळणी विमानही रत्नागिरीहून धाडलं. या विमानाने संपूर्ण स्थितीची माहिती घेत वरळीतील केंद्राला कळवली. त्यानुसार या केंद्राने ‘प्रिया ही लहान नौका तिथे धाडली.

या नौकेने ‘रोहिणीच्या बाहेरील भागाची आग विशेष ‘कुलिंग प्रणालीने शांत केली. त्या मागोमाग ‘आयसीजीएस समर्थ ही नौका घटनास्थळी पाठवण्यात आली. ‘आयसीजीएस समर्थने ‘प्रिया जहाजाच्या समन्वयाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘रोहिणीच्या संपूर्ण इंजिनरूमने पेट घेतला असून धुरामुळे नौकेतील कर्मचारी हतबल होते.

यामुळे अखेर ‘आयसीजीएस समर्थमधील तटरक्षक सैनिकच भर समुद्रात नौकेवर गेले. ही आग विझवण्यासाठी त्यांचे सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. हाती आलेल्या माहितीनुसार ही आग विझली असून सध्या बेपत्ता खलाशांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. (Rohini boat catches fire near Mumbai High three sailors are missing)

मागे

मुंबईतली महाविद्यालयं बंदच राहणार
मुंबईतली महाविद्यालयं बंदच राहणार

मुंबईतली महाविद्यालयं (Mumbai College Closed)  तूर्तास बंदच राहणार आहेत. कोरोना स्थितीच....

अधिक वाचा

पुढे  

आरपीआयच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्ते लिफ्टमध्ये अडकले, रामदास आठवलेंनी उचललं ‘हे’ पाऊल
आरपीआयच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्ते लिफ्टमध्ये अडकले, रामदास आठवलेंनी उचललं ‘हे’ पाऊल

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी पुणे दौऱ्यावर हो....

Read more