ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महिला वकिलाला पोलिसांची मारहाण, पोलिसांवर कारवाई करा, अनिल गलगलींची मागणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2020 09:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महिला वकिलाला पोलिसांची मारहाण, पोलिसांवर कारवाई करा, अनिल गलगलींची मागणी

शहर : नागपूर

तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिला वकिलाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे (Anil Galgali on Nagpur Police). या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. ही घटना लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये घडली. या घटनेवर आता संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर कार्यवाही करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे (Anil Galgali on Nagpur Police).

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृह मंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, 25 मार्च 2020 रोजी नागपूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत लकडगंज पोलीस ठाण्यात अॅड अंकिता शाह यांना मारहाण करण्यात आली, ही बाब माहिती अधिकार कायदा अंतर्गत 2 ऑक्टोबर 2020 रोजी प्राप्त झालेल्या CCTV फुटेजमुळे स्पष्ट होत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाहीची अपेक्षा आहे. अॅड अंकिता शाह यांनी सुद्धा तक्रार केली आहे.

“नागपुरात अॅड अंकिता शाह ज्या माहिती अधिकार कार्यकर्त्या आणि मोकाट कुत्र्यांच्या अधिकारासाठी लढण्याऱ्या कार्यकर्त्या आहेत. ज्या पद्धतीने एका अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मारहाण केली जाते ती खरोखरच निंदनीय आहे. सर्व अधिकारी दरवाजावर थांबले असून एकाला अशा पद्धतीने आत आणत गैर वर्तणूक करणे कायद्यात बसत नाही, असं गलगली म्हणाले.

आजही सामान्य नागरिक पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात आणि कित्येकदा नागरिकांना चांगली वर्तणूक दिली जात नाही, ही बाब या घटनेने अधोरेखित होत आहे. महाराष्ट्रात अशा लोकांवर कार्यवाही करत कठोर शिक्षा झाली तर निश्चितपणे कोणत्याही पोलीस ठाण्यात भविष्यात असा प्रकार घडणार नाही,अशी अपेक्षा अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे.

मागे

साखर संघ आणि ऊस तोडणी संघटनांच्या सरकारकडे 'या' मागण्या
साखर संघ आणि ऊस तोडणी संघटनांच्या सरकारकडे 'या' मागण्या

उस तोडणीसाठी ४०० रुपये प्रति टन मजुरी मिळावी तसेच सध्या महाराष्ट्रात मिळणा....

अधिक वाचा

पुढे  

Hathras | मुलींसह मुलांवरही संस्काराची गरज; स्मृती इराणींचा भाजप नेत्याला घरचा आहेर
Hathras | मुलींसह मुलांवरही संस्काराची गरज; स्मृती इराणींचा भाजप नेत्याला घरचा आहेर

हाथरस आत्महत्या प्रकरणावर बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्....

Read more