ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यातून ९ वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 09, 2019 05:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यातून ९ वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर

शहर : पुणे

पुणे-२०१० मध्ये पुण्यातून बेपत्ता झालेला संतोष वसंत शेलार उर्फ विश्व हा तरुण माओवादी कमांडर असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांनी देताच एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील भवानी पेठ मधील, कासेवडी येथील संतोष कुटुबियांसह राहात होता. त्याने ९ वी तून शाळा सोडली होती. नंतर त्याने संस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. तो कबीर कला मंचा मधेही काम करीत होता. मात्र ९ वर्षापूर्वी तो अचानक बेपत्ता झाला. त्यावेळी त्यांच्या घरच्यानेही शोध घेतला. पण त्याची कुठेच काही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी यासंबंधी खडक पोलिस ठाण्यामध्ये तक्रार ही दाखल केली होती.

दरम्यान छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी तयार केली आहे. या यादी नुसार माओवाद्यांचा शोध घेत असताना संतोषची माहिती पोलिसांना मिळाली. संतोष सध्या माओवादी संघटनेत काम करीत आहे. तो राजनांदगाव या ठिकाणचा तांडा एरिया कामितीचा कमांडर असल्याची माहिती मिळाली आहे.

मागे

मालशेज घाटात 31 जुलै पर्यंत पर्यटनाला बंदी
मालशेज घाटात 31 जुलै पर्यंत पर्यटनाला बंदी

मालशेज घाटात दरडी कोसळणे आणि दुर्घटना घडण्याचे प्रकार लक्षात घेऊन ठाण्याच....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापूर मध्ये डंपर ट्रक अपघातात 4 ठार
कोल्हापूर मध्ये डंपर ट्रक अपघातात 4 ठार

गोकुळ शिरगाव कडे जाणारा ट्रक आणि डंपर यांच्यात घोटंवडे गावाजवळ भीषण अपघात ....

Read more