ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इस्त्रोची विक्रम साराभाई पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इस्त्रोची विक्रम साराभाई पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा

शहर : delhi

भारतीय अंतराळ क्षेत्राचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्त्रोने विक्रम साराभाई अंतराळ, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा केली आहे. हे पुरस्कार अंतराळ, विज्ञान, उपयोजना आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये सक्रिय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी दोन श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे.

पत्रकारितेमध्ये चांगला अनुभव असलेल्या सर्व भारतीयांसाठी नामांकने खुली आहेत. यासाठी सन 2019 ते 2020 या वर्षात प्रसिद्ध झालेले लेख विचारात घेतले जातील. दोन श्रेणीतील पुरस्कारांपैकी पहिल्या श्रेणीत पाच लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून मुद्रित प्रसारमाध्यमातील दोन पत्रकार किंवा  मुक्त पत्रकारांनाही पुरस्कार दिले जातील. दुसऱ्या श्रेणीमध्ये रोख रक्कमेची तीन पारितोषिके असून 3 लाख, 2 लाख, आणि 1 लाख रुपये रोख व स्मृतिचिन्हे असे त्याचे स्वरूप आहे.

प्रथम श्रेणीच्या पुरस्कारासाठी अर्ज दाखल करणार्‍या पत्रकारांमधून नियत कालिके, विज्ञान पत्रिकांमध्ये पसिद्ध झालेले लेख,यशोगाथा यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल. तर द्वितीय श्रेणीच्या पुरस्कारासाठी लोकप्रिय वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्रांमध्ये हिंदी इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषांमधील लेख अथवा यशोगाथा विचारात घेतल्या जातील. या पुरस्कारांसाठी निवड झालेल्यांची नावे 1 ऑगस्ट  2020 रोजी जाहीर केली जातील असे इस्रोने म्हटले आहे

मागे

आता एनईएफटी करा कधीही
आता एनईएफटी करा कधीही

येत्या डिसेंबरपासून एनईएफटी म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सुव....

अधिक वाचा

पुढे  

सांगलीत बोट बुडून झालेल्यापैकी दुर्घटनेत 9 जणांचे मृतदेह सापडले
सांगलीत बोट बुडून झालेल्यापैकी दुर्घटनेत 9 जणांचे मृतदेह सापडले

सांगली-कोल्हापुरात मुसळधार पावसाने थैमान मांडले असून पूरापासून नागरिकांच....

Read more