ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

1 लाख रूपयांच्या 2 साड्या चोरल्याने दुकानदाराला फुटला घाम

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 02:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

1 लाख रूपयांच्या 2 साड्या चोरल्याने दुकानदाराला फुटला घाम

शहर : bangalore

एका महिलेची तक्रार ऐकून पोलीसही उडाले आहेत. रोज मेरी एम. या महिलेने साडीच्या दुकानातून दोन साड्या चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. या साड्यांची एकूण किंमत ही 1 लाख रूपये आहे. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. दोन महिला आणि दोन पुरुष या चोरीमध्ये सामील असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तनिरा या साड्यांच्या दुकानामध्ये एक मध्यमवयीन महिला एका पुरुषासोबत आली होती. तिच्यासोबत एक तरूणी आणि एक युवकही होता. हे सगळे एकाच कुटुंबातले असल्याचं दुकानदारांना भासवत होते. महिलेने दुकानातील कर्मचार्‍यांना साड्या दाखवायला सांगितल्या.

यावेळी सोबत असलेला पुरुष इतर कर्मचार्‍यांसोबत गप्पा मारत होता तर युवक आम्हाला काहीतरी खायला मागवा असं सांगत होता. महिलेने शोकेसमधील साडी दाखवायला सांगितली आणि समोर असलेल्या साड्यांपैकी दोन साड्या गुपचूप उचलल्या. कर्मचार्‍याने दाखवलेली साडी घालून बघण्याच्या बहाण्याने ही महिला कपडे बदलायच्या खोलीत गेली आणि चोरलेल्या साड्या कपड्यांच्या आत लपवल्या. थोड्यावेळाने हे सगळे जण दुकानातून निघून गेले. दुकान बंद होण्यापूर्वी साड्यांची मोजणी सुरू असताना दोन साड्या कमी असल्याचं कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. शोधाशोध सुरू असताना काही कर्मचार्‍यांनी सीसीटीव्ही दृश्य पाहायला सुरुवात केली. यावेळी त्यांना महिलेने साड्या चोरल्याचं दिसलं. या साड्यांची किंमत पाहीली असता ती एक लाखाच्या घरात असल्याचं कळालं. रोज मेरी एम. यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.

मागे

मराठा समाजाकडून राज्य सरकारला आव्हान; 24 तासांत निर्णय घ्या अन्यथा...
मराठा समाजाकडून राज्य सरकारला आव्हान; 24 तासांत निर्णय घ्या अन्यथा...

मराठा समाजाच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यानं चंद्रकांत पाटलांना फोन....

अधिक वाचा

पुढे  

जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांची मुख्यमंत्र्यांना भेट
जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांची मुख्यमंत्र्यांना भेट

प्रचंड कर्जभारामुळे जमिनीवर आलेल्या खासगी हवाई कंपनीचा नवा खरेदीदार कोण ह....

Read more