ठळक बातम्या आयुर्वेदानुसार रुईच्या झाडाचे पान आहे आरोग्यासाठी फायदेमंद, हा गं’भी’र आजारही कायमस्वरूपी दूर करतो !.    |     टायफाइड असल्यास, हे उपाय केल्यानं मुळातून टायफाईड जाणार.    |     कापराच्या तेलाचे जादुई फायदे.    |     आर्थिक स्थिती मजबूत होईल जर घरात वाहणार सकारात्मक ऊर्जा.    |     हृदयविकारांच्या झटक्यापासून वाचवणार हे घरगुती औषध.    |    

दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही : अजित पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2020 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही : अजित पवार

शहर : पुणे

दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही, दिवाळीनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यातील विधानभवन सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अजित पवारांनी ही माहिती दिली.

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार, या अभियानाला पुणेकरांनी साथ द्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटपही केले.

बैठकीत अजित पवार म्हणाले की, पुण्यामध्ये डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, हा अंदाज खोटा ठरवण्यासाठी जबाबदारीने वागा. तसेच कोरोनाला लाईटली घेऊ नका, काहीजण हनुवटीच्या खाली मास्क लावतात, ‘नो मास्क च्या दंडाच्या माध्यमातून 12.5 कोटी जमा झाले आहेत. पुणेकरांनो हे बरं नाही असंही अजित पवार म्हणाले.

 

 

मागे

निर्णय झाला, मात्र सर्व महिलांना प्रवास परवानगी देण्याबाबत संभ्रम
निर्णय झाला, मात्र सर्व महिलांना प्रवास परवानगी देण्याबाबत संभ्रम

राज्य सरकारने महिला प्रवाशांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा आज, शनिवारपा....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनावरील लस कुठवर पोहोचली, पंतप्रधान मोदींचे अधिकाऱ्यांना 'हे' आदेश
कोरोनावरील लस कुठवर पोहोचली, पंतप्रधान मोदींचे अधिकाऱ्यांना 'हे' आदेश

एकिकडे देशात coronavirus कोरोना अधिक बळावत असतानाच दुसरीकडे या विषाणूचा संसर्ग नि....

Read more