ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४ वर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 12:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४ वर

शहर : मुंबई

महाराष्ट्रात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे मुंबईत 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पंधरा दिवसांअगोदर सुरत येथून आला होता. त्याला 19 मार्च रोजी मुंबईतील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यानच रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे याअगोदर 17 मार्च रोजी मुंबईच्या कस्तूरबा रुग्णालयात 64 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी मुंबईतच दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत 6 तर पुण्यात 4 अशा नव्या रुग्णांची वाढ

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वेगान वाढत आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल 12 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज पुन्हा 10 नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. या 10 पैकी 6 रुग्ण मुंबईतले आहेत. तर 4 रुग्ण पुण्यातील आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 74 वर

महाराष्ट्रात कोरोना फोफावत चालला आहे. राज्यात कोरानाबाधित रुग्णांचा आकडा आता 74 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे महाराष्ट्रात कालपर्यंत कोरोनाबाधितरुग्णांची संख्या 64 होती, मात्र आज ही संख्या 74 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च

पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च

पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च

पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च

मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च

नागपूर (1) – 12 मार्च

पुणे (1) – 12 मार्च

पुणे (3) – 12 मार्च

ठाणे (1) – 12 मार्च

मुंबई (1) – 12 मार्च

नागपूर (2) – 13 मार्च

पुणे (1) – 13 मार्च

अहमदनगर (1) – 13 मार्च

मुंबईत (1) – 13 मार्च

नागपूर (1) – 14 मार्च

यवतमाळ (2) – 14 मार्च

मुंबई (1) – 14 मार्च

वाशी (1) – 14 मार्च

पनवेल (1) – 14 मार्च

कल्याण (1) – 14 मार्च

पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च

औरंगाबाद (1) – 15 मार्च

पुणे (1) – 15 मार्च

मुंबई (3) – 16 मार्च

नवी मुंबई (1) – 16 मार्च

यवतमाळ (1) – 16 मार्च

नवी मुंबई (1) – 16 मार्च

मुंबई (1) – 17 मार्च

पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च

पुणे (1) – 18 मार्च

पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च

मुंबई (1) – 18 मार्च

रत्नागिरी (1) – 18 मार्च

मुंबई महिला (1) – 19 मार्च

उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च

अहमदनगर (1) – 19 मार्च

मुंबई (2) – 20 मार्च

पुणे (1) – 20 मार्च

पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च

पुणे (2) – 21 मार्च

मुंबई (8) – 21 मार्च

यवतमाळ (1) – 21 मार्च

कल्याण (1) – 21 मार्च

एकूण – 74 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च

दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च

पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च

महाराष्ट्र – 56 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च

एकूण – 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

मागे

कोरोनाचा कहर सुरुच, जगभरात अशी भंयकर स्थिती
कोरोनाचा कहर सुरुच, जगभरात अशी भंयकर स्थिती

कोरोना व्हायरसने जगभराक 12,592 लोकांचा बळी घेतला आहे. सगळ्यात जास्त मृत्यूचं प....

अधिक वाचा

पुढे  

लोकलमागोमाग BEST बसही बंद करण्याचा प्रशासनाचा विचार
लोकलमागोमाग BEST बसही बंद करण्याचा प्रशासनाचा विचार

जगभरात थैमान घालणाऱ्या Corona कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी....

Read more