ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पेब किल्ल्यावर पार्टी करणार्‍या तरुणांना शिवभक्तांनी केली मारहाण

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 05:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पेब किल्ल्यावर पार्टी करणार्‍या तरुणांना शिवभक्तांनी केली मारहाण

शहर : मुंबई

          नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून आलेले ११ तरुण माथेरानच्या पेब किल्यावर पार्टी करण्यासाठी आले होते. मात्र त्या तरुणांनी आपल्या बरोबर दारूच्या बाटल्या, गांजा तसेच अमली पदार्थ आणले होते. तेथे त्यांनी मध्यपान व अमलीपदार्थांचे सेवन करून किल्ल्यावर गोंधळ घातल्याची माहिती मिळताच जवळपास असलेल्या काही स्थानिकांनी आणि शिवभक्तांनी त्वरित धाव घेऊन त्यांना चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे.

           पार्टीसाठी आलेले तरुण  अतिप्रमाणात अमलीपदार्थांचे  सेवन केल्यानंतर गडावर गोंधळ घालत होते. नशेमध्ये धुंध असलेल्या सर्व तरुणांना शुद्धीवर आणून त्यांचे कपडे काढून शिवभक्तांनी माफी मागायला लावली. अक्षय भोसले, किरण नागडा, राहुल नाहीर, ऋषी शहा, मानस अग्रवाल, मिलिंद राठोड, वैभव बोहरी, दीप ताऱ्या, संजय चांदवाणी, इशांत ठक्कर, ऋषभ शेठ नशा करणार्‍या सर्व तरुणांची नावे माध्यमातून समोर आली आहे.

            ११ तरुणांना शिवभक्तांनी आणि स्थानिक लोकांनी ताब्यात घेऊन त्यांना समजावण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत त्यांना त्वरित आळा घालण्यासाठी कायद्याच्या आधार घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे.   
 

मागे

२६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला 'नो एन्ट्री'
२६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला 'नो एन्ट्री'

           प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चि....

अधिक वाचा

पुढे  

कमी किमतीत कॉलिंग आणि डेटा फ्री मिळू शकणारे बेस्ट प्लान्स; पहा ...
कमी किमतीत कॉलिंग आणि डेटा फ्री मिळू शकणारे बेस्ट प्लान्स; पहा ...

        नवी दिल्ली - तोट्यातून बाहेर पडण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी दरवा....

Read more