ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवाजी पार्क मैदानाचं नाव अखेर बदललं, नावाची अधिकृत पाटी लावली!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2020 01:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवाजी पार्क मैदानाचं नाव अखेर बदललं, नावाची अधिकृत पाटी लावली!

शहर : मुंबई

दादरमधील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानाला यापुढे छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हणून ओळखलं जाणार आहे. नुकतंच मुंबई महापालिकेकडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली आहे. या मैदानाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मार्चमध्ये महापालिका सभेत मंजूर करण्यात आला होता. मुंबईतील दादरची ओळख असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलण्यात आलं आहे. शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं करण्यात आलं आहे. या नामविस्ताराचा प्रस्ताव मार्चमध्ये महापालिका सभेत मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे तब्बल 73 वर्षांनी शिवाजी पार्क या मैदानाचे नाव बदलण्यात आलं आहे.

दादरमधील शिवाजी पार्क मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. या मैदानात अनेक राजकीय सभा पार पडतात. विशेष म्हणजे हे मैदान क्रिकेटसाठीही प्रसिद्ध आहे. या मैदानात अनेक क्रिकेटपटू घडले आहेत.

मूळ माहीम पार्क अशी ओळख असणाऱ्या या उद्यानाचे 10 मे 1927 रोजी शिवाजी पार्क असं नामकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर 1966 मध्ये या मैदानात लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता.

महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मार्चमध्ये महासभेत या मैदानाचा नामविस्तार करण्याचा ठराव मांडला होता. या प्रस्तावाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी या ठरावाला मंजूरी दिली.

अखेर आज पालिकेने शिवाजी पार्क मैदानाच्या नावाची पाटी बदलून छत्रपती शिवाजी महाराज मैदान अशी अधिकृत पाटी लावली आहे.

मागे

कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण, समाधानकारक निकाल
कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण, समाधानकारक निकाल

कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीवर मोठ्या वेगाने काम स....

अधिक वाचा

पुढे  

विस्तारवाद ही मानसिक विकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींची चीनवर नाव न घेता टीका
विस्तारवाद ही मानसिक विकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींची चीनवर नाव न घेता टीका

दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही दि....

Read more