ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाशिकची गायिका गीता माळीचा अपघातात मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 08:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नाशिकची गायिका गीता माळीचा अपघातात मृत्यू

शहर : नाशिक

नाशिकची प्रसिद्ध गायिका गीता माळीचा आज अपघात झाला. या भीषण अपघातात गीता माळीचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील एकता हॉटेलसमोर घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. माळी यांच्या निधनाने  नाशिकमध्ये कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

या भीषण अपघातात गीता माळीचे पती विजय माळीही जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईहून नाशिक महामार्गावरुन जात असताना अचानक रस्त्यात गाडीच्या आडवे कुत्रा आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एचपी गॅसच्या टँकरला धडकली. या घटनेत गीता माळीचे निधन झाले, तर विजय माळी गंभीर जखमी झाले.

गीता माळी गेल्या तीन महिन्यापासून अमेरिकेत गेल्या होत्या. अमेरिकेहून त्या मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत त्या कारने नाशिकला येत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

गीता माळी यांनी संगीत क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली असून नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहता वर्ग आहे. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर त्यांनी नावलौकिक मिळवले आहे. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मागे

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडूंचा राजभवनावर 'प्रहार', पोलिसांनी घेतलं ताब्यात
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडूंचा राजभवनावर 'प्रहार', पोलिसांनी घेतलं ताब्यात

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ....

अधिक वाचा

पुढे  

दिल्ली उच्च न्यायालयात समान नागरिक कायद्याबाबत आज सुनावणी
दिल्ली उच्च न्यायालयात समान नागरिक कायद्याबाबत आज सुनावणी

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर आता दिल....

Read more