ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एसटीतील सहाय्यक व लिपिक टंकलेखक पदाच्या अतिरिक्त यादीला मुदतवाढ

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 05:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एसटीतील सहाय्यक व लिपिक टंकलेखक पदाच्या अतिरिक्त यादीला मुदतवाढ

शहर : मुंबई

एसटीच्या सहाय्यक व लिपिक टंकलेखक पदाच्या सरळ सेवा भरती सन 2016-17 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विभागाच्या निवड यादी व अतिरिक्त यादीची मुदत संबंधित विभागाच्या निवड व अतिरिक्त यादीवरील अंतिम उमेदवाराची नेमणूक देण्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत वाढविण्यात आली. एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतची घोषणा केली. याचा फायदा सहाय्यक पदातील 161 उमेदवारांना लिपिक पदातील 120 उमेदवाराना होणार आहे.

सरळ सेवा भरती सन 2016-17 अंतर्गत सहाय्यक व लिपिक टंकलेखक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेतील निवड यादी व अतिरिक्त यादी डिसेंबर 2018 पर्यंत निवृत होणार्‍या आंतर विभागीय बदली तसेच खाते बढतीमुळे रिक्त होणार्‍या जागा विचारात घेवून रिक्तपदाच्या संख्येनुसार तयार करण्यात आल्या होत्या. सदर याद्दयाची मुदतवाढ ही केवळ एक वर्ष असल्यामुळे तसेच या काळात विशेष अनुमती याचिका क्रमांक 28306/2017 बाबत सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश प्राप्त होईपर्यंत सहाय्यक व लिपिक टंकलेखक संवर्गात फक्त खुल्या प्रवर्गाच्या रिक्त जागांच्या बढती परीक्षा घेण्यात आल्यामुळे खुला प्रवर्ग वगळता इतर जात प्रवर्गाच्या जागा निर्माण झाल्या नसल्याने सहाय्यक व लिपिक टंकलेखक पदाच्या निवड यादीतील बरेच उमेदवार नेमणुकीपासून वंचित राहिले आहेत. सदर उमेदवारांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करून निवड यादी व अतिरिक्त यादीला मुदत वाढ देण्याचे निर्देश रावते यांनी एसटी महामंडळास दिले. त्यानुसार संबंधित विभागाच्या निवड यादीत अंतिम उमेदवारास नेमणूक देण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत निवड यादीची मुदत वाढविण्यात आली आहे.

 

मागे

गिरणगावच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बदलण्याची शक्यता
गिरणगावच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बदलण्याची शक्यता

परळ, लालबाग, लोअर परळ, करी रोड, चिंचपोकळी या गिरणगावात मोठ्या उत्साहात सार्व....

अधिक वाचा

पुढे  

लोकमंगल बायोटेक कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल
लोकमंगल बायोटेक कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल

अप्रमाणित मिश्र खताचे उत्पादन करणार्‍या लोकमंगल बायोटेक कंपणीच्या संचाल....

Read more