ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुधीर मुनगंटीवार 9 नोव्‍हेंबर रोजी फेम इंडियाच्‍या देशातील सर्वश्रेष्‍ठ मंत्री या पुरस्‍काराने होणार

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 01:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुधीर मुनगंटीवार 9 नोव्‍हेंबर रोजी फेम इंडियाच्‍या देशातील सर्वश्रेष्‍ठ मंत्री या पुरस्‍काराने होणार

शहर : मुंबई

नवी दिल्‍लीहून प्रकाशित होणा-या फेम इंडिया नियतकालीकाने एशिया पोस्‍ट या प्रसिध्‍द सर्व्‍हे एजन्‍सी च्‍या मदतीने केलेल्‍या सर्व्‍हेमध्‍ये महाराष्‍ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अनुभवी मंत्री या कॅटेगिरीत सर्वश्रेष्‍ठ मंत्री म्‍हणून गौरव केला आहे. फेम इंडिया नियतकालीकाने एशिया पोस्‍ट या सर्व्‍हे एजन्‍सीच्‍या मदतीने सर्वश्रेष्‍ठ मंत्री 2019 या गौरवासाठी एक सर्व्‍हे केला. व्‍यक्‍तीमत्‍वप्रतिमाकार्यक्षमताप्रभावमंत्रालयीन विभागाच्‍या कामाकाजाची जाणलोकप्रियतादुरदृष्‍टीकार्यशैली आणि परिणाम या सात मुद्दयांच्‍या अनुषंगाने देशातील सर्व राज्‍यांच्‍या मंत्र्यांचा 21 विविध कॅटेगिरीमध्‍ये अभ्‍यास केला. यात देशातील सर्वश्रेष्‍ठ अनुभवी मंत्री या श्रेणीत महाराष्‍ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्‍यात आली आहे. नवी दिल्‍लीतील विज्ञान भवनात दिनांक 9 नोव्‍हेंबर रोजी हा पुरस्‍कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्‍यात येणार आहे.

फेम इंडिया मॅग्‍झीन चे संचालक आणि संपादकीय प्रमुख श्री. यु. एस. सोनठालीया यांनी 9 नोव्‍हेंबर रोजी होणा-या पुरस्‍कार प्रदान सोहळयासाठी सुधीर मुनगंटीवार यांना आमंत्रीत केले आहे.

राज्‍याचे अर्थनियोजन आणि वने आणि विशेष सहाय्य या विभागांच्‍या मंत्री पदाची धुरा सांभाळणारे सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्‍या 5 वर्षात आपल्‍या कार्यकर्तृत्‍वाचा ठसा जनमानसात उमटविला आहे. अर्थमंत्री म्‍हणून महाराष्‍ट्राच्‍या आर्थिक विकासात त्‍यांनी महत्‍वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्‍ट्राच्‍या विकासाला नवी दिशा देणारे पाच लोककल्‍याणकारी अर्थसंकल्‍प त्‍यांनी सादर केले आहे. हरित महाराष्‍ट्र ही संकल्‍पना राबविण्‍यासाठी त्‍यांनी 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केला. या निर्धाराची पूर्तता करण्‍यासाठी त्‍यांच्‍या नेतृत्‍वात वनविभागाने विक्रमी वृक्ष लागवड केली. लिम्‍का बुक ऑफ रेकार्डने या विक्रमाची नोंद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्‍दा ‘मन की बात’ या कार्यक्रमात या वृक्ष लागवड मोहीमेचे कौतुक केले. यावर्षी तीन महिन्‍यात 33 कोटी वृक्ष लागवड करण्‍याची मोहीम त्‍यांच्‍या नेतृत्‍वात राज्‍यभर राबविण्‍यात आली आहे व ती यशस्‍वी सुध्‍दा ठरली आहे. महाराष्‍ट्राच्‍या लक्षणीय आर्थिक प्रगतीसाठी इंडिया टूडे तर्फे समूहातर्फे त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले आहे. द व्‍हॉईस या वृत्‍तसंस्‍थेतर्फे बेस्‍ट परफॉर्मींग मिनीस्‍टर म्‍हणून त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले आहे. विक्रमी वृक्ष लागवड मोहीमेसाठी त्‍यांना विविध प्रतिष्‍ठेच्‍या पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले आहे. फेम इंडिया नितकालीकातर्फे देशातील सर्वश्रेष्‍ठ मंत्री म्‍हणून त्‍यांची झालेली निवड त्‍यांच्‍या कार्यकर्तृत्‍वाचा गौरव करणारी आहे. 

मागे

सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचा देशव्यापी संप
सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचा देशव्यापी संप

रवीवार, सोमवार त्यानंतर मंगळवारी देखील बँका बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्ष....

अधिक वाचा

पुढे  

सरकारने तुमच्या खात्यात टाकले पैसे....
सरकारने तुमच्या खात्यात टाकले पैसे....

दिवाळीआधी केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना गिफ्ट दिलं आहे. ६ कोटी पीए....

Read more