ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आरेमधील वृक्षतोडीला स्थगिती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 05:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आरेमधील वृक्षतोडीला स्थगिती

शहर : मुंबई

आरेमधील मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरु राहणार आहे, काल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान हे स्पष्ट केलं आहे. मात्र वृक्षतोडीवर स्थगिती आणली आहे. आरेतील वृक्षतोडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर पर्यावरणविषयक खटल्यांचे कामकाज पाहणाऱ्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान महापालिकेच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आरेमध्ये सध्या कोणतीही झाडे तोडण्यात आली नसल्याची माहिती दिली.

तसंच सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.  इमारतीचा कोणताही प्रकल्प सुरु होत नसून त्या जागी फक्त आरे कारशेडचा प्रकल्प सुरु आहे.रोहतगी यांनी दिल्लीत मेट्रो सुरु झाल्यानतंर सात लाख वाहनं रस्त्यावरुन कमी झाली आहेत. तसेच वायू प्रदूषणही कमी झालं आहे. असेही न्यायालयात सांगितले त्यानंतर न्यायालयाने मेट्रो प्रकल्पावर कोणतीही स्थगिती नाही. ही स्थगिती फक्त वृक्षतोडीविरोधात मर्यादित असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान याप्रकरणाची पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.

मागे

शेतकर्यांतच्या 50 हजार रुपयांच्या नोटा उंदराने कुरतडल्या
शेतकर्यांतच्या 50 हजार रुपयांच्या नोटा उंदराने कुरतडल्या

तामिळनाडूत कोइंबत्तूरमधील वेलिंगाडू गावातील शेतकरी रंगराज या शेतकर्‍या....

अधिक वाचा

पुढे  

2 ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्राची य़शस्वी चाचणी
2 ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्राची य़शस्वी चाचणी

तिन्ही सेना दलात वापरता येणाऱ्या 2 ब्रम्होस्त्र क्षेपणास्त्राची वायुसेने....

Read more