ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

2016च्या आधीही झाल्या अशा सर्जिकल स्ट्राईक - निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 05, 2019 12:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

2016च्या आधीही झाल्या अशा सर्जिकल स्ट्राईक - निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा

शहर : देश

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाकडूनसर्जिकल स्ट्राइकवरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी भाष्य केलं आहे. लष्करानं आधीही सीमा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक केल्याचं हुडा यांनी म्हटलं. यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला हुडा यांनी उत्तर दिलं. 'भारतीय लष्करानं याआधीही सीमा ओलांडून कारवाया केल्या आहेत. मात्र त्या नेमक्या कुठे आणि कधी केल्या याची मला कल्पना नाही,' असं हुडा यांनी जयपूरमध्ये पत्रकारांना सांगितलं. लष्कराच्या कामाचं राजकारण करणं अयोग्य असल्याचंदेखील ते पुढे म्हणाले. 'निवडणुकीच्या प्रचारात लष्कराला आणणं योग्य नाही. निवडणूक आयोगानंदेखील तशा सूचना दिलेल्या आहेत. राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचारात लष्कराच्या कामगिरीचा वापर होणं दुर्दैवी आहे. दीर्घकालीन परिस्थितीचा विचार केल्यास याचे लष्करावर प्रतिकूल परिणाम होतात,' असं हुडा यांनी म्हटलं. भारतीय लष्करानं उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये हुडा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या भाषणांमध्ये अनेकदा राष्ट्रीय सुरक्षा आणि सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत आहेत. मोदींच्या या भाषणांवर काँग्रेसकडून टीका होत आहे. गेल्याच आठवड्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावर भाष्य करताना मोदींवर शरसंधान साधलं. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र लष्करानं केलेल्या कारवायांचा आम्ही कधीही मतांसाठी वापर केला नाही, असं सिंग म्हणाले. यानंतर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. काँग्रेसनं ठिकाणं आणि तारखांसह सर्जिकल स्ट्राइक्सची माहिती पत्रकारांना दिली. यावरुन केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसवर निशाणा साधला. यूपीए सरकारनं केलेले सर्जिकल स्ट्राइक अदृश्य होते, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.

 

 

 

                                                         

मागे

या वाहनांना टोल होणार माफ, नंबरप्लेट्स हिरवी
या वाहनांना टोल होणार माफ, नंबरप्लेट्स हिरवी

सध्या पर्यावरणाचा प्रश्न अत्यंत बिकट होत आहे. त्यात वाढते प्रदूषण. त्यामुळ....

अधिक वाचा

पुढे  

ओडीशातील फोनी चक्रीवादळात 16 जणांचा मृत्यू
ओडीशातील फोनी चक्रीवादळात 16 जणांचा मृत्यू

ओडीशातील चक्रीवादळ फोनीच्या विळख्यात येऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ....

Read more