ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मागण्या मान्य न झाल्यास शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2019 06:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मागण्या मान्य न झाल्यास शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा

शहर : मुंबई

समान काम समान वेतन या प्रमुख मागणीसह आमच्या अन्य मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी दिला आहे. दरम्यान आज आझाद मैदानावर आपल्या मागण्यासाठी मोर्चा काढणार्‍या शिक्षकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यात 10 ते 15 शिक्षक जखमी झाले. परिणामी तनावाची स्थिती निर्माण झाली होती.

मराठी व प्रादेशिक भाषेतील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 19 वर्षापासून अनुदान सुरू केलेले नाही, त्यांचे अनुदान सुरू करावे,ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना 20 टक्के अनुदान सुरू केलेले आहे.त्यांना नियमांनुसार अनुदान द्द्यावे, समान काम समान वेतन द्द्यावे, इत्यादि मागण्यासाठी विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी आझाद मैदानावर मोर्चा काढला. तेव्हा या शिक्षकांवर पोलिसांनी लाठीमार करताच परिस्थिती तणावग्रस्त झाली. ही माहिती मिळताच पोलिस उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेवून शिक्षणमंत्री आशीष शेलार यांना यासंबंधी संपर्क साधून माहिती दिली. तसेच शिक्षकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाला शेलार यांनी भेटायला बोलावल्याचा निरोप पोलिस अधिकार्‍यानी दिला. पोलिसांच्या शिष्टईमुळे मोर्चेकर्‍यांचे शिष्टमंडळ शिक्षण मंत्र्यांना भेटायला गेले.

 

मागे

पोलिसांच्या मदतीसाठी 12 हजार होमगार्ड
पोलिसांच्या मदतीसाठी 12 हजार होमगार्ड

राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी 12 हजार जवान कायम स्वरुपात पुरविण्यात आले आहेत.....

अधिक वाचा

पुढे  

भीषण अपघातात 5 जण जागीच ठार
भीषण अपघातात 5 जण जागीच ठार

गुलबर्गा जिल्ह्यातीलआळंद आळंदी येथे दक्षिण सोलपुरातील चिंचपुरच्या चडचणे ....

Read more