ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित तेलंगणाच्या सहा जणांचा 'कोरोना'मुळे मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 31, 2020 12:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित तेलंगणाच्या सहा जणांचा 'कोरोना'मुळे मृत्यू

शहर : देश

निजामुद्दीन परिसरातील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेलेल्या तेलंगणामधील सहा जणांचा मृत्यूकोरोनामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक भाविक उपस्थित असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तेलंगणाहून 20 भाविकांचा जत्था गेला होता. त्यापैकी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती तेलंगणा सरकारने दिली.

13 ते 15 मार्च दरम्यान दिल्लीच्या मर्कजमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तेलंगणामधील सहा जणांचा कोरोना संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला. गांधी हॉस्पिटलमध्ये दोघांचा, तर अपोलो हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, निजामाबादमधील रुग्णालय आणि गडाडवालमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला, असं परिपत्रक तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलं आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन भागातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या व्यक्तींनी आपणहून पुढे यावे, त्यांना कोणी काहीही बोलणार नाही, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यांच्यावर विनाशुल्क उपचार केले जातील, असे आवाहन तेलंगणा सरकारने केले आहे. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथके तयार केली आहेत. ही पथकं दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांचा शोध घेतील.

एकाएकी सहा रुग्णांचा कोरोना संसर्गाने मृत्यू होणं, ही तेलंगणासाठी चिंतेची बाब आहे. ​​मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कालच परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं जाहीर केलं होतं. नवीन प्रकरण समोर आल्यास तेलंगणा 7 एप्रिलपर्यंतकोरोनामुक्त होईल, असा दावा त्यांनी केला होता. एका व्यक्तीव्यतिरिक्त इतर सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचेही ते म्हणाले होते.

 

मागे

कोरोना विषाणू संदर्भात एप्रिल फूल मेसेज व्हायरल केल्यास पोलीस गुन्हा दाखल करणार
कोरोना विषाणू संदर्भात एप्रिल फूल मेसेज व्हायरल केल्यास पोलीस गुन्हा दाखल करणार

दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रो....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाचे संकट : संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान
कोरोनाचे संकट : संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान

गोमूत्र आणि गायीचे तूप हे अति तीव्र जंतुनाशक आहे. त्यामुळे केंद्र  सरकार आ....

Read more