ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा : आदित्य ठाकरे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 29, 2020 06:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा : आदित्य ठाकरे

शहर : मुंबई

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना इच्छा असेल त्याला कोरोना चाचणी करण्याची मुभा असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची शंका असणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला आपल्या शंकेचं समाधान करता येणार आहे. तसेच कोरोनाच्या भीतीत राहणं टाळता येणार आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले, “‘चेस व्हायरसमुंबई महानगर प्रदेशात राबवली जात आहे. तुमचे सुरक्षा गिअर्स खाली ठेवू नका. मास्क खाली उतरवू नका. आपला कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यावरच भर आहे. मागील काही आठवड्यापासून हे अभियान राबवण्यात येत आहे. लवकरच यांचे निकाल दिसतील.

सर्वाधिक चाचण्याच्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. आज मुंबईत कोरोनाच्या केवळ 700 रुग्णांची नोंद आहे. आज एकाच दिवसात सर्वाधिक 8 हजार 776 चाचण्या घेण्यात आल्या. मुंबईकरांना इच्छा असेल त्याला चाचणी करण्याची मुभा देण्यात येईल.”

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये मुंबईचाही गौरव केला. नागरिकांना आपल्या इच्छेप्रमाणे कोरोना चाचणीची मुभा देणारं मुंबई हे एकमेव शहर असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

दरम्यान, मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा सोमवारी (27 जुलै) सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1 लाखाहून अधिक होता. यापैकी आतापर्यंत बरे झालेले एकूण रुग्ण 81 हजार 944 इतके आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 73 टक्के इतका आहे. सध्या मुंबईत एकूण 21 हजार 812 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांच्या दुपटीचा दर 68 दिवस आहे. तसेच कोव्हिड वाढीचा दर 20-26 जुलैदरम्यान 1.03 टक्के आहे.

 

मागे

नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्व कमी, कोणकोणते बदल?
नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्व कमी, कोणकोणते बदल?

नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. देशातील शिक्ष....

अधिक वाचा

पुढे  

नाशिकमध्ये पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीत तब्बल 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
नाशिकमध्ये पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीत तब्बल 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीतील तब्बल 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह....

Read more