ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुणे जिल्ह्यातील वाहनांची संख्या ६१ लाखांवर...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 11:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुणे जिल्ह्यातील वाहनांची संख्या ६१ लाखांवर...

शहर : पुणे

पुणे  जिल्ह्यात वाहनांच्या संख्येने ६१ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे पुणे शहर आणि लगतच्या भागातील वाहनांची संख्या जवळपास ३९ लाख एवढी झालीय. तसेच मागील दोन वर्षाच्या तुलनेत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे २०१८-१९ मध्ये वाहनांची नोंदणी कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. तर, मागील वर्षभरात जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत सुमारे साडे चार लाखांची भर पडली आहे. त्यामध्ये तब्बल ३ लाख केवळ दुचाकी आहेत. मागील काही वर्षांपासून पुणे शहर आणि लगतच्या परिसरातील उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, रोजगाराच्या संधी वेगाने वाढत गेल्याने लोकवस्ती वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत गेली. आरटीओच्या पुणे विभागामध्ये पुणे (एमएच १२), पिंपरी चिंचवड (एमएच १४) व बारामती (एमएच ४२) हे तीन जिल्ह्यातील विभाग आहेत. त्याचबरोबर सोलापुर व अकलुज हे दोन विभागही येतात. आरटीओकडून मिळालेल्या माहितीनुसार  पुण्यातील एकुण वाहनांची संख्या मार्च २०१८ अखेरीस ३८ लाख ८८ हजारांपर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये साहजिकच पुणे शहराचा वाटा अधिक आहे. पिंपरी चिंचवडमध्ये १८ लाख ७५ हजार तर बारामतीमध्ये ४ लाख ६ हजार अशी एकुण ६१ लाख ७० हजार वाहने विभागात नोंदविली गेली आहेत. मागील वर्षभरात पुण्यामध्ये २ लाख ६१, पिंपरी चिंचवडमध्ये १ लाख ५४ हजार तर बारामतीमध्ये ३१ हजार ५०० वाहनांची नोंदणी झाली. 

मागे

राहूल गांधींच्या जीविताला धोका; स्नायपर हल्ल्याची भिती
राहूल गांधींच्या जीविताला धोका; स्नायपर हल्ल्याची भिती

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. का....

अधिक वाचा

पुढे  

सैन्याच्या कामगिरीचे श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये! माजी लष्करप्रमुख दीपक कपूर
सैन्याच्या कामगिरीचे श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये! माजी लष्करप्रमुख दीपक कपूर

भारतीय जवानांनी केलेल्या लष्करी कारवाईचा राजकीय वापर होत असल्याने काही मा....

Read more