ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना रेल्वेने प्रवास करु द्या; प्रवाशांची मागणी, मनसेचा पाठिंबा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2021 08:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना रेल्वेने प्रवास करु द्या; प्रवाशांची मागणी, मनसेचा पाठिंबा

शहर : मुंबई

ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांना लोकलने, मेट्रोने प्रवास करण्याची परवानगी द्या. त्यामुळे अनेकांचा रोजगार आणि बंद पडलेलं अर्थचक्र पुन्हा सुरू होईल अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलीय. तसेच विविध प्रवासी संघटनांमधूनही अशा प्रकारची मागणी होत आहे.

अमेरिकेत बायडन यांनी देखील लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना कामासाठी बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. जर अमेरिकेत हे होऊ शकतंय तर मग भारतात का नाही? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "राज्य सरकारने अशी परवानगी दिली तर त्याचा फायदा हॉटेल व्यवसायिक, किराणा मालाच्या दुकानात काम करणाऱ्यां मोठा फायदा होईल. हा वर्ग मुंबई उपनगरांतून प्रवास करत असतो. सध्या त्यांना बाहेर पडता येत नाही. पुढे जाऊन यांना परवानगी मिळाली तरी त्यांना बसने किंवा टॅक्सीने प्रवास करणं परवडणार नाही. त्यामुळे लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यास फायदा होईल."

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, "यामध्ये खोटे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दाखवून कोणी प्रवास करु शकणार नाहीत. कारण हे सर्टिफिकेट केंद्राकडून मिळालं आहे आणि ते मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. केंद्राने राज्याला डेटा शेअर केला तर हे आणखी सुलभ होऊ शकेल."

याबाबत एबीपी माझाशी बोलताना रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध जाहीर केले आणि यामध्ये अर्थचक्र सुरळीत ठेवण्यासाठी एमआयडीसी आणि कारखाने सुरू ठेवले. परंतु यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कोणताच दिलासा दिला नाही. कामगारांना रेल्वे पास नसल्यामुळे जादा पैसे खर्च करून कामावर यावं लागत आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की आता सरकारने ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांना तात्काळ लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी. त्यामुळे उपनगरातून जाणाऱ्या व्यवसायिकांना, कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.

पुढील 15 दिवस तरी सामान्यांना लोकलचा प्रवास नाही: मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, पण संपलेला नाही. लोकल ट्रेन आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

राज्य सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची योजना आखत असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या आणि मृतांचा आकडा कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत.

मागे

फायझर-मॉडर्ना लसी भारताला इतर देशांपेक्षा खूप उशीरा मिळण्याची शक्यता...कारण
फायझर-मॉडर्ना लसी भारताला इतर देशांपेक्षा खूप उशीरा मिळण्याची शक्यता...कारण

देशामध्ये सध्या कोरोना संकटात लसीची तीव्र कमतरता आहे. काही राज्यांमध्ये, 18-45....

अधिक वाचा