ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई महापालिका मुख्यालयाची पर्यटकांना सफर घडणार, ऐतिहासिक वारसा उलगडणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 28, 2021 11:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई महापालिका मुख्यालयाची पर्यटकांना सफर घडणार, ऐतिहासिक वारसा उलगडणार

शहर : मुंबई

मुंबई महापालिकेची भव्य इमारत आता पर्यटकांना पाहता येणार आहे. शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना ही इमारत आतून पाहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (गुरुवार) संध्याकाळी 5 वाजता या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे गॉथीप शैलीतील 150 वर्षांच्या इतिहासाचा ऐतिसासिक वारसा उलगडणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कारभार हाकणार्‍या महानगरपालिका मुख्यालयाच्या हेरिटेज इमारतीची पर्यटन सफर जानेवारीपासून सर्वसामान्यांना करता येणार आहे.

मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारत दर्शन (Heritage Walk) कार्यक्रमाचा शुभारंभ आज (28 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे.

महानगरपालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करणात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील सर्वांत मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. केंद्राला सर्वांत जास्त कर देणारं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी देखील मानली जाते.

मागे

Mumbai Local | फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लोकल सुरु होण्याची शक्यता, पालकमंत्र्यांची माहिती
Mumbai Local | फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लोकल सुरु होण्याची शक्यता, पालकमंत्र्यांची माहिती

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईची लाईफलाईन समजली जाणा....

अधिक वाचा

पुढे  

पालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे अर्थपूर्ण संबंध, भाजपच्या कार्यकाळातील मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप
पालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे अर्थपूर्ण संबंध, भाजपच्या कार्यकाळातील मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एफडीआर घोटाळ्याप्रकरणी महापालिकेची फसवणू....

Read more