ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'आधी नोटीस, मग अ‍ॅक्शन', तुकाराम मुंढेंचे व्होकार्डला 2 दिवसात अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2020 11:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'आधी नोटीस, मग अ‍ॅक्शन', तुकाराम मुंढेंचे व्होकार्डला 2 दिवसात अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश

शहर : नागपूर

नागरिक आणि प्रशासन साथीरोगाचा सामना करत असताना कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याचे प्रकार घडत आहेत. नागपूरमध्ये देखील असेच प्रकार समोर आल्यानंतर नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोषी रुग्णालयांना चांगलाच दणका दिला आहे. तुकाराम मुंढेंनी अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या नागपूरमधील व्होकार्ट रुग्णालयाला 2 दिवसांमध्ये संबंधित रुग्णांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत.

पीडित रुग्णांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे अतिरिक्त शुल्क आकारल्याची तक्रार केली. यानंतर आयुक्त मुंढे यांनी प्रथम संबंधित व्होकार्ट रुग्णालयाला नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं. मात्र, रुग्णालयाच्या स्पष्टीकरणात समाधानकारक उत्तरं मिळाल्याने तुकाराम मुंढे यांनी तात्काळ अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश दिले. यासाठी दोषी रुग्णालयाला दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

व्होकार्डला पालिकेने दिलेल्या नोटीसमध्ये अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतले आहेत. यात पालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या दराने 80 टक्के बेड आरक्षित ठेवणे आणि पहिल्यांदा येतील त्यांना प्रथम या नियमाप्रमाणे उपलब्ध करुन देणे असा महत्त्वाचा ठपका ठेवण्यात आला आहे. पालिकेने या नोटीसमध्ये 4 रुग्णाच्या लाखो रुपयांच्या बिलांचा उल्लेख आहे. व्होकार्टने नोटीस देऊनही ही रक्कम परत केल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, नागपूर महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कुकरेजा यांनी स्वतः कोरोना चाचणी करुन घेतली. यात महापालिकेचे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी कोरोना चाचणी करून घेतली. यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.कुकरेजा यांना डॉक्टरांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर कुकरेजा यांनी मागील 7 दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांना स्वतःची कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.

मागे

संरक्षण उपकरणांच्या १०१ हून अधिक वस्तूंवर आयात बंदी : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
संरक्षण उपकरणांच्या १०१ हून अधिक वस्तूंवर आयात बंदी : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

'संरक्षण मंत्रालय आता आत्मनिर्भर भारत उपक्रमावर मोठा जोर देणार आहे. संरक्....

अधिक वाचा

पुढे  

Shivaji Maharaj Statue | मुंबईतील कानडी शाळांचे अनुदान बंद करा, महापौर आक्रमक
Shivaji Maharaj Statue | मुंबईतील कानडी शाळांचे अनुदान बंद करा, महापौर आक्रमक

मुंबईतील कानडी शाळांना देण्यात येणारं अनुदान राज्य शासनाने आणि महापालिके....

Read more