ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 28, 2020 09:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

...तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजे भोसले

शहर : सातारा

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी झाल्यावर, कोर्टाने ही सुनावणी ४ आठवडे पुढे ढकलली. मात्र गेले दोन आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असतानासुद्धा सरकारने जाणीवपूर्वक तयारी केली नसल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते उदयनराजे भोसलेंनी ठाकरे सरकारवर केला आहे.

जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसेल, तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही त्यांनी महाविकासआघाडी सरकारला दिला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिल्यांदाच सुनावणी पार पडणार होती. मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्याने काही काळ कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच सरकार आणि वकिलांमध्ये कसलाही समन्वय नाही, असेच सिद्ध होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका आता संशयास्पद असल्याची टीकासुद्धा उदयनराजेंनी केली आहे.

मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती देऊन चार आठवडे उलटून गेलेत, तरीही सरकार सुस्तच आहे. आरक्षणाचा निकाल लागत नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा प्रश्न कायम आहे. शेकडो तरुणांच्या नोकरीचा प्रश्न लोंबकळत पडला आहे. तरीही सरकारला जाग येत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे, याचा सरकारने तात्काळ जाहीर खुलासा करावा. मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध फुटायची वेळ आता आली आहे. या उद्रेकाची सरकार वाट पाहतेय की काय?, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील असल्याची घोषणा केलीय. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारची नेमकी दिशाच ठरलेली दिसत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील सुनावणीला हजरच नव्हते. त्यामुळे कोर्टाने काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली. ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे. आता तरी सरकारने तातडीने ठोस पाऊले उचलावीत. अन्यथा मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आता मागणी करून दीड महिना वाया का घालवला?- संभाजीराजे छत्रपती

दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती प्रचंड संतापले आहेत. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठापुढे व्हावी असं सरकारला वाटत होतं तर दीड महिन्यांपूर्वीच ही मागणी का केली नाही? आता मागणी करून दीड महिना वाया का घालवला? असा संतप्त सवाल करतानाच यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेटणार नाही, असा संतापही संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे.

मागे

गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू, साताऱ्यातील महिंदमधील घटना
गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू, साताऱ्यातील महिंदमधील घटना

गांधील माशांच्या हल्ल्यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू मृत्यू झाल्याची द....

अधिक वाचा

पुढे  

Unlock 6.0 | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक 6 ची नियमावली जारी, काय सुरु-काय बंद?
Unlock 6.0 | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक 6 ची नियमावली जारी, काय सुरु-काय बंद?

केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनबाबत नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.....

Read more