ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जम्मूत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 02:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जम्मूत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

शहर : delhi

जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटविल्यापासून तणावपूर्ण वातावरण आहे. अशा स्थितीतही जम्मूतील कटारा येथील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी कुठलेही भय न बाळगता भक्तांची अलोट गर्दी उसळलेली दिसत आहे.

केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीर मधील परिस्थिती चिघळेल,अशी शंका होती. पाकिस्तानने या भागात हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यासाठी दहशतवादी संघटनांना तयार करण्यात आले असून हे दहशतवादी काश्मिरात घुसल्याचा इशारा गुप्तचर संघटनेकडून देण्यात आला आहे. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. जम्मू कश्मीरसह संपूर्ण देशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा तणावपूर्ण स्थितित देशभरातून हजारो भक्तगण वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. विशेष म्हणजे कटारा, जम्मू, शिवखोरी , पटनी टॉप या ठिकाणी देखील पर्यटक वाढले आहेत. तेथील सर्व व्यापार सुरळीत व जोमाने सुरू आहे.

 

मागे

नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली बैलांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्याची गरज
नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली बैलांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्याची गरज

संगमनेर तालुक्यात पाटगावात जीवघेण्या नांगरणी स्पर्धेत बैल उधळले आणि स्पर....

अधिक वाचा

पुढे  

डी. एस. कुलकर्णींच्या भावाला अटक
डी. एस. कुलकर्णींच्या भावाला अटक

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपाखाली अटकेत असलेले प्रसिद्ध व्यावसा....

Read more