ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धावत्या लोकलमधून फेकलेल्या निर्माल्यातील नारळ लागल्याने महिला गंभीर जखमी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धावत्या लोकलमधून फेकलेल्या निर्माल्यातील नारळ लागल्याने महिला गंभीर जखमी

शहर : virar

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा तसेच नायगाव-पाणजू खाडी पुलावरून लोकलप्रवासी निर्माल्याच्या पिशव्या नेहमी खाडीत फेकत असतात. खाडीमध्ये निर्माल्य फेकल्यामुळे त्यातील नारळाचा फटका डोक्याला लागून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील सफाळे आणि वैतरणा स्थानकादरम्यान वैतरणा खाडीपुलावर ही घटना घडली. रोहिणी विक्रांत पाटील असे जखमी महिलेचे नाव आहे. बुधवारी डहाणूहून विरारच्या दिशेने येणार्‍या लोकलमधील एका प्रवाशाने निर्माल्याची पिशवी खाडीमध्ये फेकली. मात्र त्या पिशवीमधील नारळ वैतरणा खाडी पुलावरून पायी पायी जाणार्‍या रोहिणी पाटील यांच्या डोक्यात पडला. नरळाच्या जोरदार फटका बसल्याने जखमी झालेल्या रोहीणी चक्कर येऊन रेल्वे रुळाच्या बाजूला कोसळल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत चालणार्‍या नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमधून प्रवास करणारे अनेक प्रवासी निर्माल्याच्या पिशव्या धावत्या लोकलमधून खाडीत फेकत असतात. याचा फटका आजूबाजूने चालणार्‍या नागरिकांना बसतो. त्यामुळे लोकलमधून निर्माल्य फेकण्यावर बंदी आणण्याची  जोरदार मागणी होत आहे.

मागे

एसबीआयची 'डोअर स्टेप बँकिंग'... ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज  नाही
एसबीआयची 'डोअर स्टेप बँकिंग'... ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडि....

अधिक वाचा

पुढे  

सीएसएमटी स्टेशनवर लोकलची बफरला जोरदार धडक
सीएसएमटी स्टेशनवर लोकलची बफरला जोरदार धडक

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस स्थानकात हार्बर लाईनवरील एक लोक....

Read more