ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महिलांच्या जनधन खात्यात दोन टप्प्यात १ हजार रूपये येणार..पाहा कधी येणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 10, 2020 02:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महिलांच्या जनधन खात्यात दोन टप्प्यात १ हजार रूपये येणार..पाहा कधी येणार

शहर : देश

ज्या महिलांचे बँकेत जनधन योजनेअंतर्गत बँक खाते आहे, आणि ज्यांना अजूनही संपूर्ण २ हजार रूपये खात्यात आलेले नाहीत, त्यांना पुढील १ हजार रूपये कोणत्या महिन्यात आणि किती टप्प्यात येणार आहेत, याची माहिती सरकारने दिली आहे. सरकारने देशभरातील जनधन बँक खात्यात पैसे टाकणे सुरू केले आहे.

लॉकडाऊन लक्षात घेता सरकारने महिलांच्या जनधन खात्यात पैसे टाकले आहेत, यामुळे देशात अनेक ठिकाणी बँकांच्या समोर रांगा लागल्या होत्या.

या दरम्यान हे पैसे परत जातील अशी अफवा होती. म्हणून सरकार आता पुढील पैसे लगेच काही दिवसांनी नाही, तर काही महिन्यांनी टाकणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने गुरूवारी सांगितलं की, प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत ज्या महिला खातेदार आहेत, त्यांना पुढील २ महिन्यात, पहिल्या महिन्यात ५०० रूपये आणि दुसऱ्या महिन्यात ५०० रूपये असे एकूण १ हजार रूपये बँक खात्याच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.

हे पैसे बँक खात्यातून परत जाणार नाहीत, त्यामुळे लॉकडाऊननंतर किंवा लॉकडाऊन दरम्यानही बँकेत गर्दी करण्याची कोणतीही गरज नाही. हे पैसे संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात जमा असतील.

उर्वरित रक्कम पुढील महिन्यात येणार

महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात पहिला हफ्ता एप्रिल महिन्यात दिला गेला आहे, आता पुढील पैसे पुढील २ महिन्यात टाकले जातील, ते प्रत्येक महिन्यात ५०० रूपये असतील. मे आणि जून महिन्यात प्रत्येकी ५०० रूपये दिले जाणार आहेत.

अर्थमंत्रालयाचं ट्वीट

Department of Financial Services (DFS) ने ट्वीट केलं आहे आणि म्हटलं आहे, मे आणि जून महिन्यात महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात ५००-५०० रूपये टाकण्यात आले आहेत. लाभार्थी हे पैसे बँकेतून कधीही काढू शकतात.

 

मागे

लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबीयांचा प्रवास, सीबीआयचे पथक महाबळेश्वरला रवाना
लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबीयांचा प्रवास, सीबीआयचे पथक महाबळेश्वरला रवाना

कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.  ल....

अधिक वाचा

पुढे  

श्वास घेतल्याने आणि बोलण्याने देखील फैलू शकतो कोरोना व्हायरस, वैज्ञानिकांचा दावा
श्वास घेतल्याने आणि बोलण्याने देखील फैलू शकतो कोरोना व्हायरस, वैज्ञानिकांचा दावा

देशात कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसां....

Read more