ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आरोग्यपूर्ण आहार असूनही वजन वाढतंय? या टेस्ट नक्की करून घ्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 17, 2024 01:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आरोग्यपूर्ण आहार असूनही वजन वाढतंय? या टेस्ट नक्की करून घ्या

शहर : मुंबई

वैद्यकीय मूल्यमापन, आहारातील बदल, जीवनशैलीत बदल आणि तणाव व्यवस्थापन यांचा समावेश असलेल्या व्यापक दृष्टीकोनामुळे योग्य वजन आणि उत्तम आरोग्य मिळवण्याचा ते राखण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

आहार आरोगयपूर्ण असूनही जर वजन वाढतच असेल तर ती एक गोंधळात टाकणारी समस्या आहे. सर्वांगीण आरोग्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार आवश्यक असला तरी काही वैद्यकीय समस्यांमुळे देखील विनाकारण वजन वाढते. या लेखांत आपण अशा काही तपासण्यांबाबत माहिती घेणार आहोत ज्यामुळे आरोगयपूर्ण आहार असूनही वजन का वाढते हे समजण्यास मदत मिळेल. याबाबत डॉ. अजय शाह यांनी सल्ला दिला आहे.

थायरॉईड फंक्शन टेस्ट:

थायरॉईड ग्रंथी चयापचय नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका बजावते. थायरॉईड ग्रंथी कमी सक्रिय(हायपोथायरॉईडीझम) असल्यास चयापचय क्रिया मंदावते आणि त्यामुळे वजन वाढते. आरोगयपूर्ण आहार असला तरीही हायपोथायरॉईडीझम असलेल्या व्यक्तीला वजन कमी करण्यात अडचणी येऊ शकतात किंवा त्यांचे वजन वाढते. टीएसएच (थायरॉईड स्टीम्युलेटिंग हार्मोन) आणि टी 4 (थायरॉक्सिन) पातळी, यासारख्या तपासण्या थायरॉईडच्या कार्याचे मूल्यांकन करण्यास आणि वजन बदलास कारणीभूत असणाऱ्या समस्या समजण्यास मदत करू शकतात.

इन्सुलिन रेजिस्टन्स आणि ग्लुकोज टॉलरन्स तपासणी:

जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देतात तेव्हा इन्सुलिन रेजिस्टन्स होऊन रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे शरीरातील चरबी साठण्याचे प्रमाण वाढून तुमच्या आरोगयपूर्ण आहाराने वजन कमी करण्याचे प्रयत्न फोल ठरतात. ग्लुकोज टॉलरन्स तपासणीमध्ये शरीर ग्लुकोज सेवनाला कसा प्रतिसाद देते हे समजते आणि आणि इन्सुलिन संवेदनशीलतेचे मूल्यांकन करते. इन्सुलिन रेजिस्टन्स लक्षात घेतल्याने वेळीच व्यवस्थापन आणि वजन वाढणे प्रतिबंधित करण्यात मदत मिळू शकते.

हार्मोन पॅनेल:

चयापचय क्रिया आणि भूक यासह विविध शारीरिक कार्ये नियमित करण्यात हार्मोन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हार्मोन्समधील कॉर्टिसोल आणि सेक्स हार्मोन्स (इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन) यांच्या असंतुलना मुळे वजन वाढणे आणि चरबी वितरण यावर परिणाम होऊ शकतो. संपूर्ण हार्मोन पॅनेल तपासणी आरोगयपूर्ण खाल्ल्यानंतरही वजन वाढण्यास कारणीभूत असलेल्या हार्मोनल असंतुलनाबद्दल महत्वाची माहिती देऊ शकते.

फूड सेन्सीटीव्हिटी तपासणी:

काही वेळा वजन वाढणे हे अन्न संवेदनशीलतेशी संबंधित असू शकते. फूड सेन्सीटीव्हिटी मुळे जळजळ होणे शरीरात पाणी साचणे यासारख्या समस्या उद्भवून तात्पुरते वजन वाढण्याची शक्यता असते आरोग्यदायी अन्नपदार्थ वजन वाढवण्यास थेट कारणीभूत नसले तरी, एखादी व्यक्तीकडून नकळत असे पदार्थ खाल्ले जाऊ शकतात ज्यासाठी ती व्यक्ती संवेदनशील असते. असे पदार्थ लक्षात घेऊन ते कटाक्षाने टाळल्यास वजन कमी होण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत मिळू शकते.

आतड्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन:

पचन, पोषकद्रव्यांचे शोषण आणि चयापचय यामध्ये गट मायक्रोबायोम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आतड्यातील बॅक्टेरियाचे असंतुलन वजन वाढण्यावर आणि एकूण आरोग्यावर परिणाम करू शकते. आतड्यांतील बॅक्टेरियाच्या संरचनेचे विश्लेषण करणार्या चाचण्या निरोगी आहार असूनही वजन वाढण्यास कारणीभूत असणाऱ्या कोणत्याही डिस्बिओसिस किंवा असंतुलनाबद्दल माहिती देऊ शकतात. आरोगयपूर्ण आहार असूनही वजन वाढणे हे निराशाजनक असू शकते, परंतु हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की वजन नियमन विविध घटकांचा एक जटिल आंतरक्रिया आहे. तरीदेखील हे लक्षात ठेवले पाहिजे की, वजन नियंत्रण ही विविध बाबींवर अवलंबून असलेली एक जटिल क्रिया आहे.

योग्य तपासण्या करून, व्यक्ती वजन वाढण्याची संभाव्य मूळ कारणे शोधू शकतात आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या मदतीने त्याचे निराकरण करू शकतात.

मागे

मधुमेहाच्या रुग्णांची आवळ्याचा असा करावा आहारात समावेश
मधुमेहाच्या रुग्णांची आवळ्याचा असा करावा आहारात समावेश

आवळ्यात अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. याच्या सेवनाने आरोग्यासाठी अनेक फ....

अधिक वाचा

पुढे  

या लोकांनी अजिबात खाऊ नये पपई, वाढू शकतात समस्या
या लोकांनी अजिबात खाऊ नये पपई, वाढू शकतात समस्या

अनेकांनी पपई खायला आवडते. पपई खाण्यासाठी छान लागते. पपई खाण्याची इच्छा सगळ्....

Read more