ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दररोज जेवणात टाका चिमूटभर हिंग, कधी होणार नाही हे आजार....

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 31, 2019 09:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दररोज जेवणात टाका चिमूटभर हिंग, कधी होणार नाही हे  आजार....

शहर : मुंबई

भारतीय जेवणात स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी हिंगाची फोडणी दिले जाते. हिंगाचा सुवास तेज आणि जेवण्याची इच्छा जागृत करणारा असतो. आयुर्वेदात देखील याचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. आपण दररोज चिमूटभर हिंग वापराल तर अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकेल. हिंग पोट, लिव्हर आणि डोळ्यासाठी फायदेशीर ठरतं. जाणून घ्या रोज हिंगाचे सेवन केल्याने आरोग्यावर काय प्रभाव पडेल.

पोटासंबंधी आजार

हिंग पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज हिंगाचे सेवन केल्याने पोटासंबंधी समस्या जसे अपचन, गॅस सारख्या समस्या दूर होतात. याने पोटात गॅस, पोटातील किडे, मरोड आणि पोटासंबंधी सर्व वेदनांपासून मुक्ती मिळते.

बीपीची समस्या

हिंगात रक्त पातळ करण्याचे गुण असतात. म्हणून हे ब्लड प्रेशरच्या आजाराने त्रस्त लोकांसाठी फायदेशीर आहे. याने नसांमध्ये बल्ड क्लॉटिंग सारखी समस्या होत नाही ज्याने ब्लड प्रेशर अनियंत्रित होण्यापासून मुक्ती मिळते.

श्वासासंबंधी आजार

खोकल्याची समस्या असल्यास हिंगाचे सेवन फायदेशीर आहे. हिंग सामान्य खोकला, कोरडा खोकला, इंफ्लूएंजा, ब्रोन्काइटिस आणि दमा सारख्या आजारापासून दूर ठेवतं. डाळ, सांभार आणि भाज्यामध्ये हिंग वापरलं जाऊ शकतं. श्वासासंबंधी आजार असल्यास हिंगात जरासं पाणी मिसळून छातीला लावल्याने आराम मिळतो. या व्यतिरिक्त खोकला आणि दमा सारख्या आजारात आपण हिंगात मध मिसळून सेवन करू शकता.

मासिक धर्म

अनेक महिलांना मासिक धर्म दरम्यान वेदना सहन कराव्या लागतात. दररोज हिंगाचे सेवन केल्याने या दरम्यान होणार्‍या वेदनांपासून मुक्ती मिळते. हिंग प्रोजेस्ट्रॉन हार्मोन्स उत्पादनात मदत करतं, ज्याने ब्लड फ्लो सुरळीत राहतं. पीरियड्स दरम्यान वेदनापासून मुक्तीसाठी एक ग्लास ताकात 2 चिमूट काळं मीठ आणि 1 चिमूट हिंग मिसळून प्यावं.

डोकेदुखी

हिंगात शरीरातील आंतरिक सूज कमी करण्याची क्षमता असते. साधारणात डोक्यातील आर्ट्रिजध्ये सूज असल्यामुळे डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. अशात रोज हिंगाचे सेवन केल्याने डोकेदुखीपासून मुक्ती मिळू शकते. डोकेदुखीचे प्रमाण अधिक असल्यास एका ग्लासात 2 चिमूट हिंग उकळून घ्या. कोमट झाल्यावर दिवसातून दोनदा प्यावे.

 

 

मागे

डोकेदुखीपासून लगेचच आराम देण्यासाठी……
डोकेदुखीपासून लगेचच आराम देण्यासाठी……

डोके दुखी हे एक कॉमन प्रॉब्लम आहे. याचे बरेच कारणं असू शकतात, जसे डोळ्यांची स....

अधिक वाचा

पुढे  

मेथीदाणे अमृतसमान आहेत  कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी
मेथीदाणे अमृतसमान आहेत कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी

मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते, परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उ....

Read more