ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तंबाखू, सिगारेटची घातक सवय..World No Tobacco Day

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 31, 2019 02:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तंबाखू, सिगारेटची घातक सवय..World No Tobacco Day

शहर : देश

आज जगभरात World No Tobacco Day साजरा केला जात आहे. तंबाखू, सिगारेट सोडण्यासाठी मोठ्या इच्छाशक्तीची गरज असते. सिगारेट, तंबाखू सोडण्याचा निर्णय घ्या आणि स्वत:वर नियंत्रण ठेवा. गुटखा, सिगारेट, सिगार, हुक्का या सगळ्यामध्येच तंबाखूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेकांना सिगारेट, तंबाखू सतत घेण्याची सवय लागलेली असते. ही सवय इतकी वाढली जाते की अगदी तासा-तासाला तंबाखू, सिगारेट लागते. याचा शरीरावर खोलवर परिणाम होत असतो. कॅन्सर, तोंडाचा अल्सर यांसारखे आजारही होतात पण तंबाखू खाणं सुटत नाही. 

च्विंगम सिगारेट दूर करण्यासाठी चांगला उपाय आहे. थकवा किंवा तणावामुळे अनेकांना सिगारेट पिण्याची इच्छा होते. ज्यावेळी सिगारेट पिण्याची इच्छा होते त्यावेळी योगा करावा. योगाचे काही सोपे उपाय मन शांत करते आणि सिगारेट पिण्याची इच्छा कमी होते. सिगारेटची इच्छा झाल्यास ग्रीन टी फायदेशीर ठरते. ग्रीन टी पिण्याने सिगारेट पिण्याची इच्छा कमी होते. 

बडिशोप तूपात टाकून तव्यावर सुकवा. सिगारेट, तंबाखू खाण्याची इच्छा झाल्यास ती बडिशोप खावी त्यामुळे धुम्रपान करण्याची इच्छा होत नाही. 

विटॅमिन सीयुक्त फळं खावी. संत्री, आवळा, सफरचंद, पेरु यांसारख्या फळांमुळे या सवयीपासून सुटका होते. विटॅमिन सी शरीरातील निकोटिन डिटॉक्स करण्यासाठी तसंच तलफ कमी करण्यासाठी मदत करतात. तंबाखू, सिगारेटची इच्छा झाल्यास दालचीनी खाण्याने फायदा होतो. 

मागे

भोजनाचे काही नियम
भोजनाचे काही नियम

भोजनाच्या वेळी सभोवतालचेवातावरण आल्हाददायक असावे.   जेवतांना वादवि....

अधिक वाचा

पुढे  

त्वचा भाजल्यावर करा हे घरगुती उपाय ...
त्वचा भाजल्यावर करा हे घरगुती उपाय ...

गरम पाणी पडल्याने किंवा पेटल्याने वा गरम भांड्याला हात लागल्याने आपण भाजले....

Read more