ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ग्रीन टी चे फायदे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 04, 2019 06:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ग्रीन टी चे फायदे

शहर : मुंबई

आपण सर्व जाणतो कि ग्रीन टी चे किती फायदे आहेत.? यामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिरोधक असतात जे कर्करोगाच्या समस्या दूर करू शकते. ग्रीन टी मधील प्रतिरोधके आपल्या पेशीमध्ये मृत होणाच्या समस्येला दूर करतो त्यामुळे पेशी मृत पावण्याचे प्रमाण कमी होते. हृदयावरील हल्ल्याची समस्या पण दूर करण्यास मदत करते.

ग्रीन टी चे फायदे –:

शरीरातील कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवितो. ग्रीन टी रोज पिण्यामुळे आपले वजनपण कमी होते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते. आपले शरीर तंदुरुस्त राहते. यामध्ये जीवनसत्व मुळे सर्दीमध्येहि फार लाभ मिळतो.

ग्रीन टी साठी लागणारी सामग्री :-

ग्रीन टी ची पत्ती चम्मच ( रेडीमेड प्याक मधील )

पाणी कप

स्वादानुसार शहद

स्वादानुसार निंबू रस

ग्रीन टी बनविण्याचा विधी :-

कप पाणी गरम करावे. पाणी गरम करतेवेळी जास्त गरम करू नये. उकडन्याआधीच बंद करावे.

आता यात चम्मच ग्रीन टी ची पत्ती टाका. -3 मिनिटे मिळवत राहावे. नंतर चहाच्या कपाट गाळून घ्या. निंबू रस शहद स्वादानुसार टाकून चांगले ढवळा गरमागरम ग्रीन टी चा आनंद घ्या

सूचना :-

ग्रीन टी बनविताना त्यामध्ये दुध टाकू नका सोबतच साखरेचा वापर करू नका. हे स्वास्थासाठी हानिकारक ठरू शकते.

ग्रीन टी मध्ये पुदिन्याची पाने टाकल्यास याचा स्वाद बदलून जाईल.

ग्रीन टी चे पाणी पूर्णपणे उकडलेले नसावे.

बाजारात ग्रीन टी ब्याग चा वापर हि करू शकता.

ग्रीन टीच का ?

हजारो वर्षापासून भारतीय आयुर्वेदात ग्रीन टीचा वापर केला जातोय. सध्याचा चहा इंग्रजांनी भारतात आणला. त्याआधी भारतीय लोक वनौषधी पान पाण्यात टाकून प्यायचे.

एशिया खंडात सर्वात जास्त उच्च रक्तदाबाचे रोगी आहेत. कर्करोगाचे रोगीही येथे बऱ्याच प्रमाणात जास्त आहेत.

चीन देशात ग्रीन टी चा शोध लागला. आता संपूर्ण जागत याचा वापर वाढत आहे.

याच्या वापरामुळे कर्करोग उच्चरक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच वजन कमी करणे झोप चांगली लागणे असे अनेक फायदे यापासून होतात. याच्यातील प्रतिरोधक तत्व आपल्या आरोग्यासाठी फारच लाभदायी ठरतात.

ग्रीन टी चे फायदे

.वजन कमी करणे

ग्रीन टी शरीरातील पाचन तंत्रास वाढवतो.

अतिरिक्त चरबीस शरीरातून बाहेर टाकतो. पोलीफिनोन तत्वामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर टाकता येते. त्यामुळे रक्तप्रवाह विकसित होते. वजन कमी करण्यास मदत होते.

.मधुमेह

ग्रीन टी च्या सेवनामुळे रक्तामधील साखर कमी करता येते. त्यामुळे मधुमेहांच्या रुग्णासाठी हि एक वरदान सिद्ध होते. हे इन्सुलिन ला नियंत्रित करतो त्यामुळे मधुमेहात त्रास कमी होतो.

3.हृदयासंबंधी आजार

वैज्ञानिकच्या मते ग्रीन टी हि रक्तवाहिनी नलीकांवर मजबुतीचे आवरण चढवते त्यामुळे रक्तातील अतिरिक्त चरबी साखर शरीराबाहेर टाकल्या जाते. तसेच रक्ताचा प्रवाह हृदयात चांगला ठेवतो.

.भोजन नलीकेचा कर्करोग

ग्रीन टी मुळे भोजन नलीकेच्या कर्करोगाची समस्या दूर होते. यासोबतच आणखी काही हानिकारक कर्करोगांमध्ये डॉक्टर ग्रीन टी चे सेवन करण्याचे सुचवतात याचे नियमित सेवन केल्यास कर्करोग निर्माण करणाऱ्या कोशिकांना नष्ट करता येते.

कोलेस्ट्रोल

ग्रीन टी रक्तातील घाण म्हणजेच कोलेस्ट्रोल ची मात्र कमी करण्यास फायदेशीर ठरते.

.दातांमधील सडने

अभ्यासातून या गोष्टीचा सुगावा लागला आहे. कि ग्रीन टी पिल्याने दातातील हानिकारक ब्याक्टेरीया आणि वायरस कमी होतात त्यामुळे दात सडत नाहीत दात स्वस्थ ठेवले जातात.

.रक्तदाब

रोज सकाळी ग्रीन टी चे सेवन रक्तदाब नियंत्रित ठेवतो.

.मानसिक दडपण

ग्रीन टी च्या सेवनाने आपले मानसिक आरोग्य चांगले होते. मस्तिष्कातील चेतापेशींना अधिक प्रभावी बनविल्यामुळे मानसिक दडपण येत नाही मनस्थिती उत्तम राहते.

.एन्टी वायरल आणि एन्टी ब्याक्टेरीयल

ग्रीन टी मध्ये एन्टी वायरल आणि एन्टी ब्याक्टेरीयल तत्व असतात. त्यामुळे इन्फ़्लुएन्जा च्या कर्करोगापासून बचाव होते. अभ्यासातून हे समजले आहे कि ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पेय आहे.

१०.त्वचेची रक्षा

ग्रीन टी मुळे त्वचेच्या संबंधी विविध समस्यांवर चांगले उपचार करता येतात. ग्रीन टी च्या सेवनाने त्वचा निरोगी ताजी तवानी बनते. तसेच उन्हाळ्यात त्वचेच्या सूर्यकिरणामुळे होनाऱ्या त्रासाला कमी करते.

मागे

हि लक्षणं दिसल्यास तो कॅंसर असू शकतो?
हि लक्षणं दिसल्यास तो कॅंसर असू शकतो?

आपलं आरोग्य हे सर्वात मोठ आपल्याला मिळालेलं धन आहे. खरतर असं म्हणतात की पहिल....

अधिक वाचा

पुढे  

स्वाइण फ्लू चा मुंबईत पहिला बळी
स्वाइण फ्लू चा मुंबईत पहिला बळी

केइएम रुग्णालयात स्वाइण फ्लू मुले गोवंडी येथे राहणार्‍या दानिश्ता  खान ....

Read more