ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सलाड आणि फळे खाल्ल्यावर पिऊ नये पाणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 01:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सलाड आणि फळे खाल्ल्यावर पिऊ नये पाणी

शहर : मुंबई

फळे किंवा सलाड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, जड वाटणे अशी समस्या उद्भवते. यामागील मोठे कारण म्हणजे कच्ची फळे किंवा सलाड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय. आयुर्वेदानुसारही कच्च्या भाज्या आणि फळांचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे योग्य नाही. हे खाल्ल्यावर पाणी प्याल्यास ब्लोटिंगची समस्या होते.

पाणी पिऊ नये -: फळांमध्ये मोठ्या प्रमाणात शुक्रोज, फ्रुक्टोज आणि यीस्ट असते. फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पाणी आणि अॅसिडचा घोळ पोटात यीस्टसाठी विस्तार होण्यास मदत करतो. परिणामी पोटात गॅस निर्माण होतात आणि पोट फुगते.

अति खाणे टाळा -: फळे अति प्रमाणात खाणे टाळावे. सलाड आणि फळे खाल्ल्यानंतर पोटाचा त्रास होण्यामागे अयोग्य प्रमाणात सेवन करणे हे कारण ठरते.

चावून खा -: फळांचे सेवन करताना पोटात आढळणारे बॅक्टेरिया सामान्यापेक्षा अधिक वेगाने कार्बन डायऑक्साइडचे निर्माण करू लागतात. ज्यामुळे पोट जड वाटू लागते. तसेच ढेकर येण्याची आणि पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळे योग्य प्रमाणात आणि चावून चावून खावे.

अतिसाराचा धोका -: फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते आणि फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने अतिसाराचा धोका वाढू शकतो.

 

 

मागे

पित्ताच्या त्रासावर या उपायांनी मिळेल आराम
पित्ताच्या त्रासावर या उपायांनी मिळेल आराम

चुकीची जीवनशैली, सततची धावपळ, वेळी-अवेळी खाणे, फास्ट फूड, जागरण, मानसिक ताणतण....

अधिक वाचा

पुढे  

दिवसा घेतलेली झोप देते विविध आजारांना आमंत्रण
दिवसा घेतलेली झोप देते विविध आजारांना आमंत्रण

एका निरोगी मनुष्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे. मेडिकल सायन्सनुसार रात्री कम....

Read more