ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आंतरराष्ट्रीय योगा दिन जाणून घ्या प्राणायामाचे प्रकार व त्याचे फायदे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 11:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आंतरराष्ट्रीय योगा दिन जाणून घ्या प्राणायामाचे प्रकार व त्याचे फायदे

शहर : मुंबई

21 जून रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येईल. ज्याची सुरुवात 21 जून 2015 पासून सुरू केली होती. योगात प्राणायामाचे फार महत्त्व आहे, याला योगाचे आठ अंगांमधून चवथा अंग असा देखील म्हटले जाते. हे फारच सोपे आणि फायदेशीर योगासन आहे. ज्याला कुठल्याही वयात, लिंग आणि वर्गाचा व्यक्ती आरामात करू शकतो. प्राणायाम करताना किंवा श्वास घेताना आम्ही तीन क्रिया करतो - पूरक, कुम्भक, रेचक. अर्थात श्वास घेणे, रोखणे आणि सोडणे. तर तुम्हाला प्राणायामाचे फायदे आणि प्रकार सांगत आहोत ...

योगात प्राणायामाचे बरेच प्रकार आहे, पण काही प्रमुख प्रकार या प्रकारे आहे -

नाडी शोधन प्राणायाम

उज्जयी प्राणायाम

कपालभाती प्राणायाम

भास्त्रिका प्राणायाम

शीतली प्राणायाम

डिग्र प्राणायाम

बाह्या प्राणायाम

भ्रामरी प्राणायाम

उद्गित प्राणायाम

अनुलोम- विलोम प्राणायाम

अग्निसर क्रिया

 

प्राणायामाचे फायदे

प्राणायाम फारच फायदेशीर योगासन आहे, जो संपूर्ण शरीराला स्वस्थ बनवतो...

 

प्राणायाम फुफ्फुसाला स्वस्थ आणि मजबूत बनवतो, ज्याने त्याची क्षमता वाढते.

प्राणायाम रक्तचाप सामान्य करतो आणि हृदय संबंधी आजारांना दूर करण्यास मदत करतो.

प्राणायाम पचन क्रियेला दुरुस्त करतो.

प्राणायाम ऑक्सिजनच्या प्रचुरतेद्वारे रक्ताला घट्ट करतो आणि मस्तिष्कच्या क्रियांना उत्तम बनवतो.

प्राणायाम तणाव कमी करण्याचा सर्वात उत्तम साधन आहे.

प्राणायाम वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

योग म्हणजे नेमकं काय..?

योग संसारी,संन्यासी, तंत्रमार्गी सर्वांसाठी आहे. योग आदर्श जीवन प्रणाली आहे. योग हा जीवन जगण्याचा संतुलित, संपन्न, सुलभ सुयोग्य मार्ग आहे. फक् योगोपचार म्हणजे योग नाही. अरण्यवास, दाढी वाढवणे,भगवे कपडे घालणे, चमत्कार , सिद्धी, शाप,यामुळे योगविद्या गूढ समजली जात होती. परंतु तशी ती नाही. शास्त्रज्ञांना प्रयोगासाठी प्रयोगशाळा लागते. अनुभवायचं ते (ज्ञेय) ती क्रिया साधायची हीच त्रिपुटी ती साधते म्हणजे खरा योग ते साधणारा खरा योगी. तो निसंग असतो. अलिप्त असतो. तरीही तो कर्मयोगी ताबा मिळवून राजयोगी होतो. सर्व योगमार्गाचा समन्वय साधत योगेश्वर होतो. ते कधी ना कधी, कोणत्याही जन्मात होईल. सुरुवात आता आहोत तेथूनच करायची,उद्दिष्टप्रातीसाठी प्रयत्नयोग आचारयचा. ध्येयाकडे वाटचाल करायची.21 जूनला सर्वात मोठ्या दिवशी किमान निश्चय प्रयत्न सुरु तर करूयात.

योग हा शब्द अत्यंत सहजपणे चुकीच्या अर्थाने वापरला जातो. योग म्हणजे फक् योगासने नाहीत. योग म्हणजे ध्यान नाही. योग म्हणजे हास्यक्लब मधील हसणे नाही. कृत्रिम रित्या केलेले संमोहन म्हणजेही योग नव्हे. योग म्हणजे नियमपालनही नाही. सध्या जे पेव फुटले ते म्हणजे योगाच्या प्रकारातील एकेक अंगाचे सादरीकरण त्यालाच योग संबोधायचे. कुंडलिनी योगा, पॉवरयोगा असे परदेशातही प्रकार करतात. मुळात योग हाच योग्य शब्द आहे. योगा नव्हे. योग याचा अर्थ जोडणे. (युज धातू) आंग्लाळलेले. लोक योगाचा योगा हा चुकीचा उच्चार करतात त्या आंग्लाळलेल्या चुकीची माहिती मर्यादित माहिती योग म्हणून इतरांना सांगतात.

खरा योग योगी फारच क्वचित, लाखात एखादाच असतो. आसने प्राणायाम . मार्गाने रुग्णाला बरे करणाऱ्या पद्धतीला योगोपचार म्हणतात. जेथे फक् आसने प्राणायाम शिकवतात. त्या योगसंस्था योगशिक्षकही हे शिकवू शकतात. पण योगशिक्षक योगगुरू यात फरक आहे. वर्षानुवर्षे मी योगासने प्राणायाम करतोय. म्हणून कोणीही बाबा योगगुरू होऊ शकत नाही. तो योगशिक्षकच राहतो. प्राणायामाने त्याचा चेहरा जरी तेजस्वी झाला तरी शिक्षक तो शिक्षकच. तो गुरू नव्हे. गुरू या शब्दाची व्याप्ती खूपच व्यापक मोठी आहे. उदाहरण द्यायचं तर अलीकडचे योगगुरू मनोहर हरकरे यांचं देता येईल. बाकी योगशिक्षकच म्हणावे लागतील.

योगाचे 5 प्रकारे वर्णन करता येईल.

 

भक्तीयोग- : कोणत्याही मानवनिर्मित दैवतावर अपरंपार श्रद्धा ठेवून केलेला योग म्हणजे भक्तीयोग. सर्व संत भक्तीयोगाचे आचरण करणारे होते. पांडुरंग हे दैवत त्याची भक्ती हा उपाय करणारे संत भक्तीयोगाचे पालन करणारे होते. ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणे भक्ती कुणाला जवळची वाटते. टाळ कुटून रामनाम, विठठल नाम घेतले की, एकादशीला रात्री जागून भजने म्हटली की, नियमित वारीला गेले की, चारीधाम यात्रा, नर्मदा, परिक्रमा केली की, भक्तीयोग साधता येत नाही. खरे भक् फारच थोडे. बाकीचे भाकडभक्ती करणारेच जास्त. त्यांना भक्तीयोग साधता येत नाही. जमत त्याहून नाही. भक्ती योग सर्वात अवघड योग आहे. कांताभक्ती करणारे,पूर्ण समर्पण या हेतूने करणारे कदाचित भक्तीयोगाच्या पायरीपर्यंत पोचू शकतील. राजयोगी,हययोगी, ध्यानयोगी, भक्ती करतीलच असे नाही.

कर्मयोग-:  गीतेत सांगितलेला गृहस्थाश्रमी माणसाने,सामान्यांनी आचरायचा योग हा कर्मयोग कोणतीही अपेक्षा ठेवता कर्म करीत आहे. ही शिकवण यातून मिळते. सामान्य लोक अपेक्षा ठेवनूच भलेबुरे कर्म करीत राहतात. त्याच एक चुकीचे तत्वज्ञान बनवतात. तो कर्मयोग नाही, निस्वार्थी निर्लेप, नि:स्पृह या वृत्तीने केलेले कर्म हा कर्मयोग .

राजयोग-: मनावर ताबा ठेवून त्यातून साधना करणारे राजयोगाचे उपासक

विवेकानंदांनी थोडा फार राजयोग आचरणात आणला पण त्याला हटयोगाची जोड दिली नाही. आहारविहार व्यायामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मृत्यू लवकर तीही 5/6 रोगांची शिकार झाल्यावर आला. पुराणातील जनक हा राजयोगी शुक जास्त समर्पक उदाहरण म्हणून सांगता येईल. अर्वाचिन काळात खरे राजयोगी म्हणून सांगणार कोणीी सांगता येणार नाही.

ज्ञानयोग- : ज्ञानाच्या मार्गानेमी ची जाणीव त्यातून साधना करणारे ज्ञानयोगी सर्वात उत्तम उदाहरण ज्ञानेश्वर आपलं नाव सर्वार्थाने सार्थ करणारे ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान मुक्ता ही ज्ञानयोग्यांची उदाहरणे. या ज्ञानयोग्यांना संसाराची गरज नाही. ज्ञानसाधना करीत राहणे अंर्तमुख होऊन जीव-शिवाची भेट घडविणे हे ज्ञानयोगाचे काम.

हाही अवघड योग आहे. ज्याचा जसा स्वभाव तसा तो ज्ञानमार्गाची कास धरतो. सामान्यांसाठी हा मार्ग नाहीच. सामान्यासाठीच हा मार्ग.

हटयोग- : आसने प्राणायाम यातून साधना करणारे मार्ग हटयोग तो करणारा हटयोगी सामान्य फक् आसने प्राणायाममार्फत पोचतात. फारतर ध्यानापर्यंत समाधी अवस्था प्राप्त करणे दुर्मिळच.

योगाचे हे मार्ग आपले शिक्षण, क्षमता, योग्यता, स्वभाव आवड यावर माणसाने निवडायला हवेत. एका योगमार्गातून दुसऱ्या मार्गाकडे सहज जाताही येते. एकावेळी दोन योगमार्गही आचारता येतात. सुरुवात कुठुनही केली तरी अंतिमत: शरीर, मन या मार्गातून आत्मज्ञान मिळवले. हाच सर्व मार्गाचा शेवट आहे. पण तसे आत्मज्ञानी दुर्मिळच. पुन्हा अर्वाचित आत्मज्ञानी म्हणवणारे, स्वयंघोषित केलेले त्यांचे व्यावहारिक वर्तन, घोटाळे, कट, कारस्थाने याची सांगड घालताच येत नाही असे आत्मज्ञानी खरे योगी नाहीत. आत्मज्ञानीही नाहीत ते उत्तम संवाद साधतील, प्रवचने कितने करतील. लोकांच्या हृदयाला हात घालतील. पण तरीही त्यांना योग कळला असे म्हणता येणार नाही.बरेचजण पहिल्या पायरीवर अडतात. शरीरपातळीवर काही मनोपातळीपर्यंत येतात. आत्म्यापर्यंत तुरळक पोहचतात.

योग संसारी,संन्यासी, तंत्रमार्गी सर्वांसाठी आहे. योग आदर्श जीवन प्रणाली आहे. योग हा जीवन जगण्याचा संतुलित, संपन्न, सुलभ सुयोग्य मार्ग आहे. फक् योगोपचार म्हणजे योग नाही. अरण्यवास, दाढी वाढवणे,भगवे कपडे घालणे, चमत्कार , सिद्धी, शाप,यामुळे योगविद्या गूढ समजली जात होती. परंतु तशी ती नाही. शास्त्रज्ञांना प्रयोगासाठी प्रयोगशाळा लागते. अनुभवायचं ते (ज्ञेय) ती क्रिया साधायची हीच त्रिपुटी ती साधते म्हणजे खरा योग ते साधणारा खरा योगी. तो निसंग असतो. अलिप्त असतो. तरीही तो कर्मयोगी ताबा मिळवून राजयोगी होतो. सर्व योगमार्गाचा समन्वय साधत योगेश्वर होतो. ते कधी ना कधी, कोणत्याही जन्मात होईल. सुरुवात आता आहोत तेथूनच करायची, उद्दिष्टप्रातीसाठी प्रयत्नयोग आचारयचा. ध्येयाकडे वाटचाल करायची. 21 जूनला सर्वात मोठ्या दिवशी किमान निश्चय प्रयत्न सुरु तर करूयात.

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

मागे

फणसातील पौष्टिक गुणधर्म
फणसातील पौष्टिक गुणधर्म

सर्वात जास्त गर असलेले फळ म्हणजे फणस अशी फणसाची ओळख होऊ शकते. हे असं फळ किंवा ....

अधिक वाचा

पुढे  

योगासने सुरू करत असाल तर लक्ष द्या!
योगासने सुरू करत असाल तर लक्ष द्या!

योगाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घेण....

Read more