ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रात्री उशिरा जेवण करता? याचे परिणाम धोकादायक असू शकतात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 04:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रात्री उशिरा जेवण करता? याचे परिणाम धोकादायक असू शकतात

शहर : मुंबई

अत्यंत व्यस्त कार्यक्रमांमुळे लोकांचे जीवनशैलीमध्ये बरेच बदल झाले आहे. रात्री उशीरा जागे राहणे, तासोंतास लॅपटॉपवर बसून काम करणे, आणि रात्री उशीरा जेवण करणे.आपल्यातील बरेचजण स्वस्थ जीवनशैलीचे अनुसरणं करू शकत नसल्यामुळे त्यांना बर्याच आजारांचा सामना करावा लागतो. पूर्वी लोक निरोगी रूटीन पाळत असायचे. सकाळी लवकर उठायचे आणि रात्री लवकर झोपायचे, त्यांच्या खाण्याची वेळ देखील नियमानुसार होती. म्हणून ते निरोगी जीवन जगायचे परंतु आजकाल लोक जेवायला खूप उशीर करतात. यामुळे त्यांच्या झोपण्याच्या वेळेस आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जर आपण देखील लेट नाइट डिनरचा घेत असाल तर एकदा त्याचे होणारे नुकसान जाणून घ्या.

निरोगी आयुष्यासाठी वेळेवर झोपणे, सकाळी योग्य वेळी जागणे आणि योग्य वेळी खाण्याच्या नियमानुसार, आयुर्वेदात देखील लिहिले आहे. जर आपणही रात्री उशिरा जेवत असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टींचा सामना करावा लागेल.

1. वजन वाढणे -: जर आपण रात्री उशिरा जेवत असाल तर ते पचविणे देखील कठीण असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. त्याशिवाय रात्री उशिरा जेवण करणे वाढत्या लठ्ठपणाचे एक कारण देखील आहे.

2. तणाव - : जर तुम्ही उशीरा खात असाल तर ते झोपण्यात देखील त्रास होतो. ज्यामुळे दिवसभर थकवा आणि तणाव राहतो. ज्याने कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी लवकर जेवण सुरू करा.

3. उच्च रक्तदाब -:  रात्री उशीराने जेवण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम शरीराला होत नाही त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो उच्च बीपीची समस्या येते.

4. मधुमेह -: अन्न खाल्यानंतर बर्याचदा लोक गोड खातात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. जे नंतर त्रासदायक होऊ शकतो. रात्री लवकर जेवण करा आणि फिरा

देखील.

5. अपचन -: ज्या लोकांना अपचनचा त्रास असतो, त्यांना उशीरा कधीच खायला नको. यानी त्रास अजून वाढू शकतो.

6. चिडचिडपणा -: आपण आराम करण्यासाठी पुरेशी झोप नाहे घेत असाल, तर हे आपल्या मानसिक आरोग्यास देखील प्रभावित करते. मेंदूला पुरेसा विश्रांती मिळत नाही, परिणामी

चिडचिडपणा येतो.

7. झोप येणे - : बर्याचदा रात्री उशिरा जेवण्याने अन्न फूड पाईपमध्ये येऊ लागतो. यामुळे अस्वस्थता आणि घबराटपणा येतो आणि झोप येत नाही.

मागे

बियर पिण्याचे फायदे
बियर पिण्याचे फायदे

अल्कोहलिक पेय पदार्थांमध्ये बियर सर्वात वापरला जाणार पेय पदार्थ आहे. यात अ....

अधिक वाचा

पुढे  

कसे असावे वास्तुप्रमाणे स्टोर रूम
कसे असावे वास्तुप्रमाणे स्टोर रूम

'स्टोर रूम घराच्या दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. स्टोर रूममध्ये खाण....

Read more